Manoj Jarange Patil, Prakash Shendge Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: प्रकाश शेंडगे शाईफेक प्रकरणावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, "ते मराठ्यांच्या मागे..."

Manoj Jarange Patil: "प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. तर काहीजण असे आहेत की, ते स्वतः अशी कृत्य करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात. शिवाय सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान काही लोक करतात."

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil On Prakash Shendge: महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी समाजात आरक्षणावरून सुरु असलेला वाद शांत झाला असतानाच सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. 'मराठा समाजाच्या नादी लागू नका, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा देणारे पत्रही गाडीवर लावण्यात आलं आहे. यामुळे आता ऐन निवडणुकीच्या काळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अशातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, असं कोणीच कुणाशी करु नये, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु काहीजण तस्वतः अशी कृत्य करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात. शिवाय ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत ? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) जरांगे पुन्हा आक्रमक लढा उभारणार असल्याचं दिसत आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती देत घोषणा केली आहे. त्यासाठी बीड (Beed) तालुक्यातील नारायणगडावर मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सर्वात मोठी सभा घेणार असून या सभेसाठीची तयारी सुरु असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाला ज्यांनी पाठिंबा दिला नाही त्यांना पुन्हा एकदा इशारा दिला शिवाय पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) महाराष्ट्रातील सभांवर आणि प्रकाश शेंडगे शाईफेक प्रकरणावरही भाष्य केलं.

माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, या निवडणुकीत मी नाही. पण आता मराठा समाजाने काय करायचं ते ठरवायचं आहे समाजाचा नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे विषयाच्या बाजूने आहे त्याचां विचार करा, शिवाय जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नयेत, असं म्हणत मराठा आरक्षण विरोधकांना जरांगेंनी इशारा दिला.

यावेळी जरांगे यांनी नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारातील सभांवर देखील भाष्य केलं, मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. शक्यतो ते स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. परंतु, मराठा समाजाच्या एकीचा इथेच विजय झाला आहे, मराठा जिंकला आहे, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदींनाआणावे लागते म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, असं म्हणत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.

प्रकाश शेंडगे शाईफेक प्रकरणावर बोलताना जरांगे म्हणाले, असं कोणीच कोणाशी करु नये. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. तर काहीजण असे आहेत की, ते स्वतः अशी कृत्य करतात आणि मराठ्यांवर नाव घालततात. शिवाय सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान काही लोक करतात. मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणीही करायला नको. असल्या घटना घडायला नकोत.

ओबीसी मत मिळवण्यासाठी स्टंट

या घटनेत केवळ मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. फक्त मराठा समाजच दुश्मन का आहे? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत ? असा प्रश्न जरांगेंनी यावेळी उपस्थित केला. ओबीसींची मतं मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा देखील स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असा आरोपही जरांगे यांनी केला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT