Narayan Rane News : नारायण राणे यांनी सांगितला राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक

Narayan Rane On Uddhav Thackeray : "हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले," अशी टीकाही राणेंनी केली.
uddhav thackeray raj thackeray narayan rane
uddhav thackeray raj thackeray narayan ranesarkarnama

भाजप नेते, नारायण राणे ( Narayan Rane ) आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. राणेंकडून उद्धव ठाकरेंना वारंवार लक्ष्य केलं जातं. आता राणेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक सांगितला आहे. जेवढं राजकारण राज ठाकरे यांना कळतं, तेवढं उद्धव ठाकरे यांना कळत नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी राणे संवाद साधत होते.

नारायण राणे म्हणाले, "महायुतीत राज ठाकरे आले, तर नक्कीच फायदा होईल. राज ठाकरे माणूस म्हणून उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं सरस आहेत. जेवढं राजकारण राज ठाकरे यांना कळतं, तेवढं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना कळत नाही. राजकारणात राज ठाकरे यांचं कार्य उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले ही गोष्ट वेगळी आहे. पण, मुलगा म्हणून एकही गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही. राज ठाकरे मित्रत्व ठेवणारे आणि मित्रत्वासाठी स्वत:ला वाहून घेणारे व्यक्ती आहेत," असं कौतुक राणे यांनी केलं आहे.

uddhav thackeray raj thackeray narayan rane
Uddhav Thackeray Manifesto: ...अखेर ठाकरेंचा 'वचननामा' आला! शेतकऱ्यांसाठी 'ही' मोठी घोषणा

"उद्धव ठाकरे यांनी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत 'अबकी बार मोदी तडीपार' ही घोषणा दिली. मात्र, कसं तडीपार करणार? सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच खासदार आहेत. या निवडणुकीत एकही खासदार निवडून येण्याची शक्यता नाही. ठाकरे यांच्याबद्दल एवढ्या तक्रारी आहेत, की तुरुंगात जायला पाहिजे होते," असं हल्लाबोल राणे यांनी केला आहे.

uddhav thackeray raj thackeray narayan rane
Uddhav Thackeray News : विशाल पाटलांच्या बंडखोरीचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत संपवला विषय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com