Manoj Jarange patil Ajay Baraskar sarkarnama
महाराष्ट्र

Ajay Baraskar News : जरांगेंना विरोध करणाऱ्या बारस्करांबाबत गावकऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Ajay Baraskar Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटलांबाबत असलेल्या अजय बारस्करांनी अचानक विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे बारस्करांबाबत मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Akshay Sabale

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच अजय बारस्कर यांनी जरांगे-पाटलांवर गंभीर आरोप केले होते. तसेच, जरांगे-पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत 'सागर' बंगल्यावर येण्याचा निर्धार केला होता. याला बारस्करांनी 'तमाशा' असं म्हणत जरांगे-पाटलांवर टीका केली होती. आता बारस्करांना त्यांच्या गावातूनच विरोध होत आहे. बारस्करांच्या विरोधाचा ठराव सावेडी ग्रामस्थांनी केला आहे.

'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा, या मागण्यांसाठी जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसते होते. यावेळी जरांगे-पाटलांच्या प्रकृती ढासळल्यानंतर बारस्करांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. पण, जरांगे-पाटलांनी बारस्करांना स्टेजवरून खाली जाण्यास सांगितलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर बारस्करांनी ( Ajay Baraskar ) जरांगे-पाटलांविरोधात भूमिका घेत गंभीर आरोप केले होते. तसेच, "जरांगे-पाटील कुणाला विचारून बेमुदत उपोषणास बसले," असा सवाल बारस्करांनी उपस्थित केला होता. मात्र, आता बारस्करांच्या गावातूनच त्यांना विरोध करण्यात येत आहे.

अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीनं अजय बारस्करांचा निषेध करण्यात आला. याबद्दल सावेडी गावातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात निषेधाचा ठराव केला गेला. तसेच, जरांगे-पाटलांना समर्थन देण्याची भूमिका ग्रामस्थांनी केली आहे. "जरांगे-पाटलांना पहिल्यापासून पाठिंबा असून बारस्करांनी केलेला विरोध हा वैयक्तिक आहे. सावेडी गाव जरांगे-पाटलांच्या पाठिशी आहे," असं मतही ग्रामस्थांनी व्यक्त केलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईकडे निघालेले जरांगे-पाटील यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातूनच माघार घेतली. तसेच, 17 दिवसांपासून चालवलेले बेमुदत उपोषण समाप्त करून साखळी उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली. दुसरीकडे, जरांगे-पाटील यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT