मुंबई : 27-02-24 | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात नाना पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी "लिमिटच्या बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करतो," असं विधान केलं होतं. हे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. विधिमंडळाचा कामकाज संपवून एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुख्यमंत्री ( Eknath Shinde ) निघाले. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच अन्य काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. यावेळी हस्तांदोलन करून नाना पटोले-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा सुरू झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"काय चाललंय राज्यात साहेब...?" असा प्रश्न नाना पटोलेंनी ( Nana Patole ) मुख्यमंत्री शिंदेंना केला. त्यावर "कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की, त्याचा कार्यक्रम करतो मी," असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं. त्यावर नाना पटोलेंनी म्हणाले, "मला एक सांगा, त्याचा डेअरिंग तुम्हीच वाढवलं ना..." यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, "सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत ठिक होते..."
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी हे विधान मनोज जरांगे-पाटलांना उद्देशून केल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने याचा व्हिडीओही ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.
"कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब!, ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?" असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसनं 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.