Manoj Jarange Patil  sarkarnama
महाराष्ट्र

Video Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, 'एक महिन्यात...'

Roshan More

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सहा दिवसांपासून उपोषण करत आहेत. मंत्री देसाई यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगेंनी 30 जून पर्यंतचा वेळ दिला. मात्र, शंभूराज देसाई यांनी एक महिन्याची मुदत जरांगे पाटलांकडे मागितली.

एक महिन्यात मागण्या मान्य केला नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे म्हणत एक महिन्याचा वेळ जरांगे पाटलांनी सरकारला दिला. तसेच आंदोलनावेळी मराठ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागणे घेण्यात यावेत, मराठा-कुणबी एकच आहेत या आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. तसेच आपले उपोषण स्थगित केले.

शंभूराज देसाई Samburaj Desai यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण स्थगिन करण्याची मागणी केली. त्यावेळी एका महिन्यात मागण्या पूर्ण करू असे आश्वासन देसाई यांनी दिले. त्यावेळी 13 जुलैपर्यंत मुदत जरांगे पाटील यांनी सरकारला दिली.

सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे Eknath Shinde साहेबांनी त्याचा शब्द दिला आहे असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. तसेच हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवू, असे आश्वासन देखील दिले.

मित्र म्हणून माझं ऐका

मागण्या मान्य करू सगेसोयऱ्या बाबत किती हरकती आल्या, किती छाननी झाली हे अधिकाऱ्यांची बैठक बोलावून टाईम बॉण्ड अहवाल जाहीर करू. तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या मित्र म्हणून माझा ऐका. तुमचे प्रतिनिधी पाठवा, त्यांचे नाव सांगा, आपण बैठक मुख्यमंत्र्यांकडे लावू, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT