(Video) Manoj jarange News : अंबादास दानवे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत एकाचवेळी जरांगेंच्या भेटीला...

Ambadas Danve-Tanaji Sawant Meet Manoj jarange Maratha Reservation Issue : अंतरवालीतील वातावरण तापलेले असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवालीत दाखल झाले.
Manoj jarange-Ambadas Danve-Tanaji Sawant
Manoj jarange-Ambadas Danve-Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 13 June : कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी जरी वैद्यकीय उपचार घेतले असले तरी त्यांची प्रकृती मात्र खालावली आहे.

मराठा समाजाविरोधात मुख्यमंत्र्यांचे ओएसडी दिल्लीत फडणवीसांच्या माणसांसोबत बसून षडयंत्र रचत आहेत, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर अंतरवालीतील वातावरण तापलेले असतानाच आज थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवालीत दाखल झाले.

मराठा समाजाविरोधात मुख्यमंत्र्यांचे ओएसडी दिल्लीत फडणवीसांच्या माणसांसोबत बसून षडयंत्र रचत आहेत, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर अंतरवालीतील वातावरण तापलेले असतानाच आज थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवालीत दाखल झाले.

विशेष म्हणजे याच वेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे देखील सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोरच बसलेल्या दानवे-सावंत यांच्यातही मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. दोघांची देहबोली मात्र बरचं काही सांगून जाणारी होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी महायुतीला राज्यभरात बसला. पण, मराठवाड्यात तो सर्वाधिक बसला. त्यामुळे विजयी झालेले महाविकास आघाडीचे खासदार जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवालीत हजेरी लावत आहेत.

Manoj jarange-Ambadas Danve-Tanaji Sawant
Sambhajiraje : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील; संभाजीराजेंचा इशारा

पाच दिवसांत खासदार बजरंग सोनवणे, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, डाॅ. कल्याण काळे तसेच संभाजीनगरचे संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करतानाच काळजी घेण्याचे तसेच उपचार घेण्याचे आवाहन केले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर या सगळ्यांनी आपला पाठिंबा असल्याचे आणि त्यासाठी संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले आहे.

अंबादास दानवे आणि तानाजी सावंत यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षाच्या वतीने जरांगे यांचे उपोषण लवकर सुटावे, त्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत दिसलेला जरांगे इफेक्ट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसू नये, यासाठी सत्ताधारी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वेळीप्रमाणे मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक होऊ नये, यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

Manoj jarange-Ambadas Danve-Tanaji Sawant
Video Manoj Jarange Update : 'बजरंग बाप्पा'चे 'किंगमेकर' मनोज जरांगेच; बीडमध्ये झळकले बॅनर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com