Ajit Pawar NCP: अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डॅशिंग महिला पदाधिकारी करणार 'रामराम'

Ajit Pawar NCP Women Party Leader Leave Party : मनसेमध्ये असताना नगरसेविका झाले पण राष्ट्रवादीत संधी मिळत नसल्याने सोडणार पक्ष
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

Pune News : लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच पक्षांमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने काही पदाधिकारी पक्षाला राम राम करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश असून ही महिला पदाधिकारी एका दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली होती.

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या या महिलेने अजितदादा यांच्याबरोबर जाणे पसंत केले. ही महिला पदाधिकारी यापूर्वी मनसे (MNS) मध्ये होती. तेथे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केले असल्याची चर्चा आहे. त्या पक्षात आपल्या कामाची दखल घेतली जात नाही, असे म्हणत या माजी नगरसेवक असलेल्या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Ajit pawar
Rajya Sabha Election : रोहित पवारांच्या सुनेत्राकाकींना अ‍ॅडव्हान्समध्येच शुभेच्छा; म्हणाले, 'पळत्याच्या गळ्यात...'

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिवसेना हे देखील भाजप बरोबर महायुतीत सहभागी झालेले आहेत. त्यातच मनसेने देखील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीत घेतला आहे. त्यामुळे मनसे मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Ajit pawar
Rohit Pawar On Ajit Pawar : भाजपनेच अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, रोहित पवारांचं 'ते' ट्विट चर्चेत

मनसेमध्ये दखल घेत नसल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या या माजी नगर सेविकेला राष्ट्रवादीमध्ये योग्य संधी मिळत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता ही महिला पदाधिकारी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला देखील रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पुढील काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महिला पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरीकडे गेलेल्या दिसतील असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com