Sarthi Scholarship News: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहांच्या कामाला आता आर्थिक बळ मिळणार आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ला १२२ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक सुविधांसाठी केला जाणार आहे.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधापृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत माहिती दिली. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. मंजूर निधीमुळे या उपक्रमांचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांच्या उभारणीवरही विशेष भर देण्यात आला आहे. ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या आठ वसतिगृहांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृहे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
या निर्णयासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांसाठी शैक्षणिक सुविधांसोबत आर्थिक आणि रोजगारविषयक संधींच्या दृष्टीनेही विविध उपक्रमांना आधार मिळणार आहे.
मराठा समाजातील युवकांच्या प्रगतीसाठी केवळ आरक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणे पुरेसे नसून शिक्षण, कौशल्य आणि रोजगारक्षमतेवरही भर देणे आवश्यक असल्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सारथीच्या विविध योजनांना महत्त्व दिले जात आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे युवक तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण घेणाऱ्यांना सारथीच्या माध्यमातून विविध प्रकारचे सहाय्य मिळत आहे. नव्या निधीमुळे या योजनांची व्याप्ती वाढवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवरही काम केले जात आहे. **शिक्षण आणि कौशल्यविकासातून तरुणांना सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, सारथीला मंजूर झालेला निधी त्याच दिशेने महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.