uddhav thackeray devendra fadnavis sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : "पुन्हा यायला अडीच वर्षे लागली, पण दोन पक्ष फोडून आलो", फडणवीसांचं विधान

Devendra Fadnavis Latest News : पवार, ठाकरे, गांधी यांच्या घराणेशाहीवरून हल्लाबोल करत काँग्रेसचा देखील फडणवीसांनी समाचार घेतला.

Akshay Sabale

'मी पुन्हा येईन' म्हटलं होतं. पण, त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेस नसती, तर भारताचं विभाजन झालं नसतं. काँग्रेस नसती, तर देशात भ्रष्टाचार झाला नसता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पवार, ठाकरे, गांधी यांच्या घराणेशाहीवरून हल्लाबोल करत काँग्रेसचा देखील फडणवीसांनी समाचार घेतला.

"'मी पुन्हा येईन' हेच वाक्य लोकांनी घेतलं"

फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "'मी पुन्हा येईन' हे फक्त वाक्य नव्हतं. त्यात मी कशासाठी, कुणाची सेवा करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' हे सांगितलं होतं. यातून फक्त 'मी पुन्हा येईन' हेच वाक्य लोकांनी घेतलं. ही कविता कुणी बंगाली आणि इंग्रजीत भाषांतर केली."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला"

"2019 मध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र, सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) आमच्या पाठीत खंजीर खुपसला. 'हे अहंकारी होते म्हणून यांचं सरकार आलं नाही,' असं जनतेनं आम्हाला म्हटलं. पण, राजकारणात हे चालूच राहिते. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी मात्र दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो," असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

"नेहरूंच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्व करतात"

"काँग्रेस नसती, तर भारताचं विभाजन झालं नसती. काँग्रेस नसती, तर देशात भ्रष्टाचार झाला नसता. राजकीय नेत्यांची मुलं-मुली राजकारणात येऊ नये, असं माझं म्हणणं नाही. पण, त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर राजकारणात यावं. हक्क म्हणून येऊ नये. नेहरूंच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं कारण तेच आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं. मात्र, ऐनवेळी आपल्या मुलीच्या हातात पक्ष दिला," असं फडणवीसांनी म्हटलं.

"...तर राजकारणात स्थान मिळणार नाही"

"उद्धव ठाकरे पक्षाची सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. त्यासाठी विचारधारा सोडण्याची तयारी त्यांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. घराणेशाहीची ऑर्डर तोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. केवळ कुणाचा मुलगा किंवा मुलगी असल्यानं राजकारणात स्थान मिळणार नाही," असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT