Devendra Fadnavis News : अजितदादा अन्‌ सुप्रियाताईंपासून लांब कोपऱ्यात जाऊन फडणवीस फोनवर कोणाशी बोलले?

Pune Multispeciality Hospital Bhumipujan : पुण्यातील वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांना दोनदा महत्त्वाचा कॉल आला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शकता आहे, त्यामुळे विकास कामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आज पुणे शहरात दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन पार पडत आहे.

पुणे महापालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्रमांक ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. फडणवीस आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे कार्यक्रमस्थळी काहीसे लवकर पोहोचले. त्यावेळी त्यांच्यामध्ये हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला. अजित पवार हे त्यानंतर कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र, त्यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कोणताही संवाद झाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
VSI Meeting : अजितदादा, वळसे पाटलांनी शरद पवारांसोबत एकत्र येणे टाळले...

या कार्यक्रमासाठी सर्वजण स्टेजवर पोहोचले असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांचा फोन वाजला आणि फडणवीस हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापासून काहीसे दूर जाऊन कोपऱ्यात फोनवर बोलू लागले. त्या वेळी उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. स्टेजवर असताना फडणवीस यांना दोनदा महत्त्वाचा फोन आल्याचा पहायला मिळाले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी फडणवीस यांना नेमका कोणाचा कॉल आला असावा, अशी चर्चा रंगली होती.

लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी भाजपने जाहीर केली आहे. दुसरी यादी पुढील एक ते दोन दिवसांत येणे अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे फडणवीसांना उमेदवारीबाबत वरिष्ठांचा कॉल तर आला नव्हता ना, अशा चर्चाही होत आहे.

Devendra Fadnavis
Supriya Sule On Ajit Pawar : आधी बारामती अन् आता पुण्यातही अजितदादांशी 'अबोला' का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

वारजे येथील मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील अबोलाबाबत जेवढी चर्चा झाली. तेवढीच चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या कॉलची देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

Edited By : Vijay Dudhale

Devendra Fadnavis
Sunil Tatkare : भाजप आणि आमच्यात उत्तम समन्वय! तटकरे म्हणाले, 'दोन दिवसात दिल्लीत पुन्हा बैठक...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com