Devendra Fadnavis News : ''सध्या नाट्यगृहाबाहेर मानापमान नाटकं, त्यात संशयकल्लोळ अन् मनाप्रमाणे कथानकं''

Devendra Fadnavis Comment on Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pimpari-Chichwad News : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक हजार पन्नास कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.9) रात्री केले. त्यात संत तुकाराम महाराज नाट्यगृहाचा समावेश होता. तो धागा पकडीत सध्या नाट्यगृहाबाहेरच जास्त मानापमान नाटके सुरु असल्याची टिपण्णी सध्याच्या राजकीय धुराळ्यावर फडणवीसांनी केल्याने त्याला मोठी दाद मिळाली आणि त्याची चर्चा झाली.

'गाढवाच्या अंगी चंदनाची उटी, राखेसवे भेटी केली तेणें...' या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करताना नाव न घेता विरोधकांना अचूक टोला लगावला. गाढवाला चंदनाची उटी लावली, तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावून घेणारच असे सांगत सध्याच्या राजकीय धुराळ्यात कोण ती लावून घेतंय हे सांगायला नको, ते तुम्हाला माहिती आहेच,असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : 'मी पुण्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय' ; फडणवीसांचे मोठे वक्तव्य!

सध्या नाट्यगृहापेक्षा बाहेरच जास्त नाटके सुरु असून त्यात मानापमानाचे खोटे अंक रंगवले जात आहेत, त्यात मनाप्रमाणे कथानक आणि संशयकल्लोळही आहे. त्यात काही नटसम्राटासारखे वागत आहेत. पण, तसे होता येत नाही. त्यांच्या काळजात कट्यार घुसणार आहे, कारण जनता सुज्ञ आहे,असे बोचरे भाष्य त्यांनी नाटकांची नावे घेत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी डंपर पलटी केलाच आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोलाही लगावला.

उद्घाटन झालेल्या चिखली येथील टाऊन हॉल (संत तुकाराम महाराज नाट्यगृह) येथून भोसरी विधानसभा मतदारसंघातील इतर 18 विविध विकासकामांची उद्घाटने आणि भुमीपुजने फडणवीसांनी ऑनलाईन केली. यावेळी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप, पिंपरीचे अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह,पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी व्यासपीठावर होते. यावेळी फडणवीसांचा चिखली ग्रामस्थ व संतपीठाच्यावतीने तुकोबांची पगडी, मृदंग देवून सन्मान करण्यात आला.

Devendra Fadnavis
Madan Bafna Vs Sunil Shelke : 'आमदार शेळकेंनी अनेकांना दमबाजी केली, पण...' ; मदन बाफनांचा मोठा दावा!

पुण्यातील कार्यक्रम उरकून आल्याने फडणवीसांनी(Devendra Fadnavis) पिंपरी-चिंचवडमध्ये १५ मिनिटांत आटोपशीर पण आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दणकेबाज भाषण केले. यावेळी त्यांनी पक्षाचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आवर्जून आठवण काढली. त्यांचाही शहराच्या जडणघडणीत वाटा असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड हे पुण्याच्या छायेत न राहता त्याची वेगळी ओळख असेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com