Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party Sarkarnama
मराठवाडा

Shivsena (UBT) Candidate List : तानाजी सावंत यांना ठाकरेंचा `हा` शिलेदार भिडणार! मराठवाड्यात बारा उमेदवार जाहीर

Shivsena Uddhav Thackeray announced Marathwada Candidate List : परांडा विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव राहुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत विरुद्ध पाटील अशी परांड्यात लढत होणार आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महायुतीतील तीनही पक्षांच्या पहिल्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात मराठवाड्यातील 12 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही.

परांडा विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव राहुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Shivsena) शिवसेनेचे मंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत विरुद्ध पाटील अशी परांड्यात लढत होणार आहे. कळमनुरीमध्ये संतोष टारफे यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. तिथे विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एकनाथ पवार हे शिवसेनेची मशाल हाती घेऊन लढणार आहेत. मराठवाड्यातील कन्नडचे उदयसिंह राजपूत, परभणीचे डाॅ. राहुल पाटील, धाराशीव कळंबचे कैलास पाटील या विद्यमान आणि पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना पक्षाने निष्ठेचे फळ दिले आहे.

संभाजीनगर मध्य मध्ये किशनचंद तनवाणी, पश्चिम-राजू शिंदे, वैजापूर-दिनेश परदेशी, सिल्लोड-सुरेश बनकर यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आली आहे. (Marathwada) सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंनी भाजपमधून आलेल्या सुरेश बनकर यांच्या हाती मशाल सोपवली आहे. सिल्लोडच्या या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

मराठवाड्यात यांच्या हाती मशाल..

1. लोहा- एकनाथ पवार

2.कळमनुरी- संतोष टारफे

3.परभणी- डाॅ. राहुल पाटील

4.गंगाखेड- विशाल कदम

5. सिल्लोड- सुरेश बनकर

6. कन्नड- उदयसिंह राजपूत

7. संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

8.संभाजीनगर पश्चिम- राजु शिंदे

9. वैजापूर- दिनेश परदेशी

10. गेवराई- बदामराव पंडीत

11. धाराशिव- कैलास पाटील

12. परांडा- राहुल ज्ञानेश्वर पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT