Shivsena UBT Vs MNS : मोठी बातमी! अमित ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला?

Uddhav Thackeray Candidate Finalized in Mahim: माहीम मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अमित ठाकरे हे मनसेकडून रिंगणात आहेत. उद्धव ठाकरे यांचा उमेदवार देखील निश्चित झालाय.
Uddhav Thackeray - Amit Thackeray
Uddhav Thackeray - Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शिवसेना (यूबीटी) यांच्याकडून या मतदारसंघात उद्धव ठाकरे उमेदवार देणार की नाही यावर चर्चा होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेनेकडून (यूबीटी) महेश सावंत यांना माहीममधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या विषयी वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

माहीम मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत रिंगणात असणार आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांची लढत दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांशी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या विरोधात महायुती आणि उद्धव ठाकरे उमेदवार देणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चा फोल ठरल्या आहेत.

Uddhav Thackeray - Amit Thackeray
Paithan Assembly Constituency: पैठणमध्ये `एकनाथांची` पसंती भुमरेंनाच! मशाल-धनुष्यबाणाला भिडणार ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले माहीम आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी घोषित झाली आहे. तर,शिवसेना (यूबीटी) यांची उमेदवार यादी अजून घोषित झाली झालेली नाही. मात्र, महेश सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत 'मातोश्री'वरून देण्यात आली आहेत.

सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता तेव्हा महेश सावंत हे चर्चेत आले होते. महेश सावंत हे शिवसेनेचे (यूबीटी) विभागप्रमुख आहेत.

संजय राऊत यांनी दिले होते संकेत

आज (बुधवार) शिवसेनेचे (यूबीटी) नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात येत आहेत तर त्यांचे स्वागतच आहे. पण शिवसेना ही स्टेटलमेंटवाली नाही. शिवसेनेचा स्थापना येथे झाली आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार असणार असे राऊत म्हणाले होते.

Uddhav Thackeray - Amit Thackeray
Sanjay Raut: शिवसेनेचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला; उमेदवारीसाठी योगेश घोलप यांचा धरला आग्रह!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com