Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Shinde group News : शिंदे गटातील १६ आमदार अपात्रतेच्या वाटेवर : शिंदे-फडणवीस सरकारचे काही खरे नाही : बड्या नेत्याचे विधान

राजकीय हेतूने या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक योजनांना स्थगिती दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

हडोळती (जि. लातूर) : राज्यातील शिंदे (Eknath Shinde)-फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार (Government) हे घटनाबाह्य आहे. निवडणूक आयोग (Election Commission) आणि सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल येणे बाकी असून सोळा आमदार अपात्रतेच्या वाटेवर आहेत, त्यामुळे या सरकारचे काही खरे नाही. आगामी काळात वेगळा राजकीय विचार अस्तित्वात येणार आहे, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (16 MLAs from Shinde group on the verge of disqualification: Ajit Pawar)

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील प्रादेशिक पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. या वेळी माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, सरपंच शकुंतला भोगे, उपसरपंच इंदुताई पवार आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राजकीय हेतूने या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. मराठवाड्याचा विकास ही फक्त घोषणा द्यायची आणि आमच्या काळात मराठवाड्यासाठी मंजूर केलेल्या योजना रद्दबादल करायच्या. हा कसला मराठवाड्यासाठी न्याय. आम्ही मूलभूत सुविधा देण्यासाठी विविध योजना राबविल्या. मात्र, या सरकारने आमच्या योजनांना स्थगिती देत नवा राजकीय पायंडा सुरू केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी पक्षात असली तरी चांगल्या योजनांसाठी आम्ही पाठापुरावा करत राहणार आहोत. या योजनेमुळे हडोळतीसह १८ गावांना पाणीपुरवठा होणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

असाही योगायोग

तिरु प्रकल्पावरील ४७ खेडी ५२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची मुहूर्तमेढ माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी रोवली होती. यामुळे अहमदपूर, जळकोट व कंधार (जि. नांदेड) तालुक्यातील ५२ गावांना पाणीपुरठा झाला. काळाच्या ओघात ती योजना कालबाह्य झाल्याने या योजनेचे पुरुज्जीवन आमदार बाबासाहेब पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुढाकारातून झाले आहे. काकांनी मुहूर्तमेढ रोवलल्या योजनेचा पुतण्याकडून पुनरुज्जीवन होण्याचा असाही योगायोग यानिमित्ताने घडून आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT