Sushilkumar Shinde Meets Jayant Patil : सुशीलकुमार शिंदे-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड अर्धा तास ‘चाय पे चर्चा’

सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांचे वस्त्रहरण सुरू आहे.
Sushilkumar Shinde-Jayant Patil -chetan Narote
Sushilkumar Shinde-Jayant Patil -chetan Narote Sarkarnama
Published on
Updated on

शिवाजी भोसले

Solapur News: सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडून एकमेकांचे वस्त्रहरण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde ) यांची बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ झाली. चर्चेला तपशील बाहेर येऊ शकला नसला तरी उभयतांमध्ये नेमक्या काय कानगोष्टी झाल्या? याबद्दलचे तर्क आणि आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मोठे राजकीय घमासान सुरु असतानाच शिंदे-पाटील यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याने या प्रकरणाला वेगळे घुमारे फुटू लागले आहेत. (Half an hour discussion between Sushilkumar Shinde and Jayant Patil behind closed doors)

Sushilkumar Shinde-Jayant Patil -chetan Narote
Praniti Shinde News : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला : प्रणिती शिंदे म्हणतात, ‘कोण रोहित पवार..? पोरकटपणा असतो काही लोकांत...’

विशेषत्वे, सोलापूर लोकसभा मतदार संघामधील राष्ट्रवादीवाल्यांचे वाढते दौरे हे काँग्रेसवाल्यांची डोकेदुखी वाढणारे ठरत आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पाटील यांनी नुकताच सोलापूर दौरा करत सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. काँग्रेस राष्ट्रवादीमधील दुसऱ्या फळीमधील नेत्यांमध्ये वादाला चांगलेच तोंड फुटले. उभयातांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा वापरली गेली.

सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला हवी असेल तरी बारामती लोकसभा आणि कर्जत जामखेड विधानसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसने करीत राष्ट्रवादीवर शाब्दीक हल्ले चढविले. त्यास राष्ट्रवादीवाल्यांनीदेखील ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवीत जोरदार प्रत्युत्तर दिले. सोलापूर लोकसभा मतदार संघात जागा सोडण्यावरुन सध्या हायव्होल्टेज ड्रामा आणि प्रचंड घमासान, शाब्दीक युध्द रंगले आहे.

Sushilkumar Shinde-Jayant Patil -chetan Narote
Rajan Patil News : राजन पाटलांच्या मनात नेमकं काय? चर्चा भाजप प्रवेशाची; पण हजेरी राष्ट्रवादीच्या बैठकीला

याचदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी रात्री सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक संपवून पुढे रवाना होण्याच्या बेतात असणाऱ्या पाटील यांना सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी चहाचे आवतान दिले. गुरुवारी रात्री उशीरा ‘जनवात्सल्य’ या ठिकाणी शिंदे आणि पाटील यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत ‘चाय पे चर्चा’ चर्चा झाली. या दरम्यान कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. बंद दाराआडून जेव्हा जयंतराव पाटील बाहेर आले, तेव्हा ते हसतमुख चेहऱ्याने आणि रिलक्समध्ये मूडमध्ये दिसले. त्यावरुन या चर्चेवेळी काही ताणतणाव नसावा, हेदेखील अधोरेखित होते.

जयंतरावांना सहज चहापाण्याला बोलाविले : सुशीलकुमार शिंदे

जयंत पाटील यांच्या ‘जनवात्सल्य’ भेटीच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सुशीलकुमार शिंदे यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जयंवतराव पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली होती, त्यावरुन त्यांना सहज चहाला बोलावले. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा किंवा काँग्रेसला ठेवण्याचा विषय हा खूप वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची निवडणूक एकत्रीत लढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर मग कोणती जागा कोणाला सोडायची हा विषय येतो. सध्या कोणी कोणाला जागा सोडायची हा विषय नाही.

Sushilkumar Shinde-Jayant Patil -chetan Narote
Solapur Lok Sabha News : सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत जयंत पाटलांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘उमेदवारीबाबत...’

चहाचे निमंत्रण होते; म्हणून गेलो : जयंत पाटील

जयंतराव पाटील यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांचे चहाचे निमंत्रण होते. सोलापूर दौऱ्यावर होतो, त्यामुळे चहासाठी गेलो. त्यांच्यासोबत सहज गप्पा मारल्या. प्रकृतीची चौकशी वगैरे झाली.अर्धा तासाच्या बैठकीदरम्यमान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सोलापूर लोकसभेची जागा सोडण्याचा विषय हा श्रेष्ठींच्या स्तरावरचा आहे. श्रेष्ठी त्याबाबत बोलतील.

जयंतरावांची चाचपणी

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मात्र सोलापूर जिल्ह्यातील तसेच शहरातील काही पक्षामधील काही खास अभ्यासू तसेच विश्‍वासू नेतेमंडळींकडून चाचपणी केली. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीसाठी कशी अनकुल होऊ शकते, याची माहिती जाणून घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com