Praniti Shinde News : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला : प्रणिती शिंदे म्हणतात, ‘कोण रोहित पवार..? पोरकटपणा असतो काही लोकांत...’

ही त्यांची पहिली टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल.
Rohit Pawar- Praniti Shinde
Rohit Pawar- Praniti ShindeSarkarnama

Solapur News: सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) जोरदार जुंपली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करताच काँग्रेस नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आज तर आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ‘कोण रोहित पवार?’ असा सवाल करत पोरकटपणा असतो काही लोकांमध्ये. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की मॅच्युरिटी येईल,’ असे खडे बोल सुनावले. (MLA Praniti Shinde's reply to Rohit Pawar)

कांही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. त्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आम्ही सोलापूर सोडला, तर आम्हाला बारामती मतदारसंघ सोडणार का, असा सवाल केला होता. त्याला राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांनी बारामतीकरांना आव्हान देणं म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना अडचणीत आणण्यासारखे आहे, असे उत्तर दिले होते.

Rohit Pawar- Praniti Shinde
Rajan Patil News : राजन पाटलांच्या मनात नेमकं काय? चर्चा भाजप प्रवेशाची; पण हजेरी राष्ट्रवादीच्या बैठकीला

त्यानंतर आज खुद्द प्राणिती शिंदे यांनीच रोहित पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या "कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल.

Rohit Pawar- Praniti Shinde
Solapur Lok Sabha News : सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत जयंत पाटलांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘उमेदवारीबाबत...’

सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयाचा, या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिना, दोन महिन्यात होईल, असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची, हेदेखील त्याच बैठकीत ठरेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध रंगले आहे. आता यात आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

Rohit Pawar- Praniti Shinde
Patil-Fadnvis News :तुमच्याकडे जलसपंदाबरोबर अर्थमंत्रीपदही आहे, त्यामुळे मराठवाड्यासाठी...: जयंत पाटलांनी फडणवीसांना घातली गळ

प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याबाबत भाष्य

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीतील नेत्यांवर शाब्दिक आणि आता फिजिकल हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार या हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. महिला आमदारांवर हल्ले होतात, तीही एकटे असताना त्या मागचे कारण शोधले पाहिजे महिला आमदारावर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवालही प्रणिती यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com