Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Riot at Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल

Police Alert in Sambhajinagar : अधिकाऱ्यांसह २० पोलीस कर्मचारी जखमी

सरकारनामा ब्युरो

FIR Registered for Riot : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर शहरात बुधवारी (ता. २९) मध्यरत्री दोन गटात राडा झाला. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांच्या नऊ गाड्या जाळल्या. तर राममंदिरांच्या बाहेरची कमान जाळण्यात आली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात अधिकाऱ्यांसह २० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या राड्यास कारणीभूत ठरलेल्या सुमारे ३०० ते ४०० अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील किराडपुऱ्यात किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्याचे पर्यावसान भांडणात झाले. बुधवारी मध्यरात्री सुरू झालेला वाद गुरुवारी (ता. ३०) पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता. दोन गट एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. अश्रूधुराचा वापर पोलिसांनी केला. अचानक एका गटाने दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांसमोरच दोन्ही गट भिडले. काही घरावरही जमावाने दगडफेक झाली. सध्या येथील पोलिसांच्या नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारात एक गट राम मंदिराच्या दिशेन जात असताना दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. दोन्हा गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तेथे राडा झाला. आता या प्रकरणी सुमारे ३०० ते ४०० अज्ञात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यांच्यावर किराडपूर भागात दंगल घडविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या लोकांवर दंगल घडविणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकिय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, शासकिय मालमत्तेचे नुकसान करणे, लोकांना दबावाखाली ठेवणे अशा विविध कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या शहरातील रस्ते काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यमंत्री डॉ. भगवान कराड (Bhagwan Karad), खासदार इम्जियाज जलील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी देखील किराडपुरा भागात धाव घेतली आणि शांततेचे आवाहन केले आहे. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT