Uddhav-Thackeray-Eknath-Shinde Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra politics : शिंदेंच्या सेनेत निधीवाटपावरून खदखद व्यक्त होताच ठाकरेंच्या नेत्याचा दावा; म्हणाले,'मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील'

fund allocation controversy News : उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या बड्या नेत्यानी याबाबत मोठा दावा केला. मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील, असा दावा केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrpati Sambhajinagar News : राज्यात लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने एकीकडे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही जणांनी येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील, असा दावा केला जात आहे. त्यामुळे राजकारण एकीकडे ढवळून निघाले असतानाच एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेत निधीवाटपावरून खदखद व्यक्त करण्यात आली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपावरून आपली खदखद व्यक्त केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या बड्या नेत्यानी याबाबत मोठा दावा केला. मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील, असा दावा केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपात मतदारसंघाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर शिरसाट यांनीही कोणाला किती निधी देण्यात आला, याचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु सत्तार यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या पक्षात नेत्या-नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचा दावा केला जात आहे.

यावरून आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेवर विरोधी पक्षाकडून टीका केली जात असतानाच विधानपरिषदेचे आमदार अंबदास दानवे यांनी शिंदे यांचा पक्ष नसून ती तर एक गँग आहे. त्यांच्यात गँगवॉर चालत राहते, असे म्हणत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या या नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे गटातील काही नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा केला आहे. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले. यावेळी बोलताना शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता घरघर सुरू झाली आहे. काही लोक आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात शिंदेंच्या सेनेत मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील, असेही खैरे म्हणाले.

त्यासोबतच शहरातील काही लोक शांत आहेत. काही लोक म्हणतात जुनी शिवसेना बरी आहे, असा दावा करीत आहेत. तसेच शिंदे गटातील नेत्यांमध्येच बेबनाव झाला तर आम्हाला बरे आहे. त्यांच्यात भांडणं झाली तर त्याचा फायदा उचला, असे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सांगावे लागेल, असेही खैरे यावेळी म्हणाले.

SCROLL FOR NEXT