Suresh Bankar Sillod Constituency Sarkarnama
मराठवाडा

Sillod Assembly Constituency : मतदारसंघातील तरुण बेरोजगार, पण सत्तारांच्या दोन्ही मुलांना रोजगार मिळाला

Sattar's attempt to grab farmers' land in the name of MIDC : मंत्री सत्तारांनी महिला, रोजगार सेवक, बेरोजगार तरुणांचे मेळावे घेतले. एकीकडे शिवणा येथील सुशिक्षित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले. तर दुसरीकडे रोजगार मेळावा घेतला.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी ही केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचे षड्‍यंत्र असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी केला. मंत्री अब्दुल सत्तार एमआयडीसीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघातील तरुणांना रोजगार नाही, पण सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलांना मात्र रोजगार मिळाला असल्याचा टोलाही बनकर यांनी लगावला. त्यांचा हा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. सत्तार यांच्या या दडपशाहीला सिल्लोडची जनता या निवडणुकीत झुगारून परिवर्तन केल्याशिवया राहणार नाही, असा विश्वास बनकर यांनी व्यक्त केला. तालुक्यातील पालोद सर्कलमधील अन्वी, आसडी, राहिमाबाद, सारोळा, मांडणा, लिहाखेडी, मंगरूळ, हट्टी गावांमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

तालुक्यातील पालोद सर्कलमधील अन्वी, आसडी, राहिमाबाद, सारोळा, मांडणा, लिहाखेडी, मंगरूळ, हट्टी गावांमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. (Shivsena) यावेळी सुनील मिरकर, शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. राहुलकुमार ताठे उपस्थित होते.

मंत्री सत्तारांनी महिला, रोजगार सेवक, बेरोजगार तरुणांचे मेळावे घेतले. एकीकडे शिवणा येथील सुशिक्षित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले. तर दुसरीकडे रोजगार मेळावा घेतला. मतदारसंघातील एकाही तरुणाला रोजगार मिळाला का?

असा प्रश्न उपस्थित करीत फक्त मंत्र्यांच्या दोन्हीं मुलांना रोजगार मिळाल्याची टीका सुरेश बनकर यांनी केली. मंत्री सत्तार थापा मारण्यात पटाईत असून मतदारसंघाची सेवा करण्याची एक संधी द्या, अशी भावनिक साद सुरेश बनकर यांनी मतदारांना घातली. शेख शफीक शांतीलाल अग्रवाल, देविदास आमटे, संजय कळात्रे, रामदास हिवाळे, शुभम अन्वीकर, सुभाष नवल, मानसिंग ठाकूर, गणेश नवल, सुनील भोकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT