Sillod Assembly Constituency : अब्दुल सत्तारांचा विकास म्हणजे फक्त फलक लावून नारळ फोडणे

Suresh Bankar of Mahavikas Aghadi says Sattar's development is a waste : स्थानिक लोकप्रतिनिधींकडून रस्ताकामांचे फक्त फलक लावून नारळ फोडली जातात. स्वत:च्या शाळा, मेडिकल कॉलेज हाच त्यांचा विकास का? असा सवाल त्यांनी केला आहे.
Suresh Bankar Sillod Constituency
Suresh Bankar Sillod ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पण पंधरा वर्षापासून आमदार असलेले आणि मंत्री पद उपभोगलेले सत्ताधारी मात्र नुसत्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे फलकाचे उद्घाटन आणि नारळ वाढवणे इतकेच आहे, असा टोला सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.

तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, कंत्राटदारांना पोसण्याचे काम करून नागरिकांना धारेवर धरण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहे, असा आरोप बनकर यांनी केला. (Abdul Sattar) मतदारसंघात परिवर्तन संवाद दौरा करत सुरेश बनकर यांनी वातावरण ढवळून काढले आहे. कोणत्याही परिस्थितीत आता बदल हवाच, असे आवानह ते मतदारांना करत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधींकडून रस्ताकामांचे फक्त फलक लावून नारळ फोडली जातात. स्वत:च्या शाळा, मेडिकल कॉलेज हाच त्यांचा विकास का? असा सवाल त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बनकर यांचा विजय निश्चित असून निकालानंतर मंत्री सत्तार माजी होतील, असा दावा सुनील मिरकर यांनी आपल्या भाषणात केला.

Suresh Bankar Sillod Constituency
Raosahebe Danve v/s Abdul sattar News : सत्तार- दानवे यांच्यात फुटणारे फटाके आवाज करणार का?

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सुरेश बनकर विरुद्ध अब्दुल सत्तार हे तिसऱ्यांदा समोरासमोर उभे आहेत. (Mahavikas Aghadi) शिवसेना महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मतदारसंघातील मित्रपक्ष असलेली भाजप गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या शिवाय निवडणुक पत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारीची दखल निवडणुक आयोगाने तातडीने घेतली आहे. सध्या त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असला तरी निवडणुक आयोगाच्या कारवाईची टांगती तलवार सत्तार यांच्या डोक्यावर आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

Suresh Bankar Sillod Constituency
Shivsena News : राज्यातील सत्तेचा महामार्ग ठरविणार 'या' 49 जागांवरील लढती; उद्धव सेना की शिंदे सेना ठरणार वरचढ?

मतदारसंघातील उंडणगाव सर्कलमधील केळगाव, खुल्लोड, पांगरी, रेलगाव, अंभई, पिपळगाव घाट, सिरसाळा गावांमध्ये बनकर यांनी प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला. सुनिल मिरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.राहुलकुमार ताठे, अजित पाटील, शांतीलाल अग्रवाल, अरुण काळे, उत्तम शिंदे, कृष्णा बावस्कर, विष्णू काटकर, देविदास आमटे यांची यावेळी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com