Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : पालकमंत्रिपद मिळून काहीतास उलटत नाही,तोच सत्तारांच्या अडचणी वाढल्या; कोर्टाचे 'या' प्रकरणी समन्स

Chhatrapati Sambhajinagar Court summons : आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते पालकमंत्रिपदी कायम होते. पण त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत थेट छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा पक्ष आणि स्वत:ही अडचणीत येणाऱ्या सत्तारांवर छत्रपती संभाजीनगरसारख्या मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोपवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मनसेकडून मुख्यमंत्र्‍यांच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मात्र, पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेल्या सत्तारांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण सिल्लोड कोर्टाने त्यांना समन्स बजावले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांना समन्स बजावले आहेत.यात 12 ऑगस्टला सत्तार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या शपथपत्रांमध्ये खोटी माहिती आणि कागदपत्रे दिल्याचा आरोप सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकरपेल्लींकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

महायुतीतील भाजपकडून छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपदावर दावा ठोकण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर 14 दिवसांत 2 पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) हे आता दिल्लीत खासदार राहणार आहे.त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला होता.

संदिपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर त्यांच्या आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला होता. भुमरे यांच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार याविषयीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते पालकमंत्रिपदी कायम होते. पण त्यांनी या पदाचा बुधवारी (ता.24) राजीनामा दिला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT