Mumbai News : सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेली बैठक पुढे ढकलण्याची विनंती करूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या गैरहजेरीत घेतली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याचा आरोप आमदार संजय जगताप यांनी केला आहे.
या कारणावरून आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या कारणावरून सत्ताधारी मंडळींना चांगलेच धारेवर धरले आहे. (Sanjay Jagtap News )
मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पुरंदर आणि हवेली तालुक्यातील विकास काम व विविध प्रश्नासंदर्भात बैठक बोलावली होती. याची माहिती आमदार संजय जगताप यांना मिळताच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये ही बैठक पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतरही त्यांनी ही बैठक घेतली. त्यामुळे संजय जगताप चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक तुम्ही पुढे ढकलावी, अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी त्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक त्याच दिवशी घेतल्याने संजय जगताप आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदाराच्या विनंतीला मान न देता पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यासोबतच लोकप्रतिनिधींचा देखील अपमान केला आहे, अशी टीका आमदार संजय जगताप यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.