Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून संदिपान भुमरे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. यानंतर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
मात्र, पालकमंत्रिपदी ते कायम होते. आता त्यांनी या पदाचाही राजीनामाही दिला आहे.त्यांच्या जागी आता शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री असणार आहे.
संदिपान भुमरे यांनी खासदार झाल्यानंतर त्यांच्या आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला होता.भुमरे यांच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार याविषयीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
महायुतीतील भाजपकडून छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपदावर दावा ठोकण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर 14 दिवसांत 2 पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) हे आता दिल्लीत खासदार राहणार आहे.त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला होता.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता भुमरेंकडे राहिलेला नाही. भुमरेंकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आलं आहे असं आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलं होतं.
पण आता अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे हिंगोलीचेही पालकमंत्रिपदही आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.