Abhijeet Dipke NEET Protest Sarkarnama
मराठवाडा

Abhijeet Dipke NEET Protest : 'अभिजीतच्या जिवाला दिल्लीत धोका'; बहिणीची राष्ट्रपतींकडे धाव, आंदोलनावर नवे संकट

Abhijeet Dipke sister seeks President intervention over his safety during the NEET protest in Delhi : NEET पेपरफुटीप्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला 34 दिवस पूर्ण; बहिणीने बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवत महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा देण्याची मागणी केली.

Pradeep Pendhare

NEET Paper Leak Protest : नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणावरून केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी' या उपहासात्मक पक्षाचे अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने देशातील 150 शहरे व्यापली आहे. यावरून केंद्रातील भाजपच्या मोदी सरकाराची कोंडी होताना दिसत आहे.

दिल्लीत गेल्या 34 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. यामुळे दिपके यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. बहिण स्नेहा यांनी अभिजीत यांच्या प्रकृत्तीची चिंता व्यक्त करताना, त्यांच्या जिवाला दिल्लीत धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्नेहा हिने थेट राष्ट्रपतींना यासंदर्भात निवेदन पाठवले आहे.

नीट परीक्षा (NEET Exam) पेपरफुटीप्रकरणावरून, दिल्लीत सीजेपी या उपहासात्मक पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनाने देश व्यापू लागला आहे. या आंदोलनात युवक-युवती बिनधास्तपणे उतरत बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधात आक्रमकपणे व्यथा मांडत आहेत. अभिजीत दिपके यांनी सहा जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज 34 दिवस झाले आहे.

आंदोलन सुरू झाल्यापासून अभिजीत दिपके हे त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) कुटुंबियांच्या संपर्कात नाहीत. दिल्लीत आंदोलनस्थळी ते ठाण मांडून आहेत. यातच त्यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले. अभिजीत यांनीच याची माहिती सोशल मीडियावरून देताना, 'टायफाइड' झाल्याचे सांगितले आहे.

यातच अभिजीत यांची बहीण स्नेहा यांनी त्यांच्या जिविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. स्नेहा यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अभिजीत संपर्कात नाही. फोनवर संपर्क होत नाही. दिल्लीतील लाठीचार्जमुळे त्याची काळजी वाटते. हा त्रास त्यालाही नको व्हायला आणि त्याच्याबरोबर असलेल्या कुणालाच होऊ नये, अशी प्रतिक्रिया सेन्हा वंजारे यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. तेच लाठीचार्ज करत आहे. मुलांना मारत आहेत. दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमुळे एक मुलगी वारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा अभिजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळावी, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याचे स्नेहा यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT