Ausa Assembly Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Ausa Assembly Constituency 2024 : बसवराज पाटलांची ताकद आता अभिमन्यू पवारांच्या पाठीशी!

Abhimanyu Pawar's path is easy in Ausa constituency due to former MLA Basavaraj Patil : कामाची पद्धत आणि सरकारी दरबारी असलेले वजन या आमदार अभिमन्यू पवारांच्या जमेच्या बाजू आहेत. औसा मतदारसंघात त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे आणि त्यासाठी आणलेला निधी या जोरावर ते मतदारांना सामोरे जात आहेत.

Jagdish Pansare

जलील पठाण

Maharashtra Assembly Election 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत औशाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्याबाबतीत एक वेगळाच योग जुळून आला आहे. 2019 मध्ये ज्या बसवराज पाटील यांच्या विरोधात लढून अभिमन्यू पवार निवडून आले होते, त्या बसवराज पाटील यांची ताकद आता त्यांच्या पाठीशी असणार आहे. बसवराज पाटील यांनी काही महिन्यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आधी विरोधात लढलेले पाटील आता अभिमन्यू पवारांच्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

बसवराज पाटील मुरूमकर हे गेल्या निवडणुकीत अभिमन्यू पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. (Abhimanyu Pawar) आता ते भाजपामध्ये असल्याने अभिमन्यू पवार यांच्या विजयासाठी मोलाची भूमिका बजावणार आहेत. याशिवाय ज्यांनी गेल्या निवडणुकीत आमदार पवारांना भक्कमपणे मदत करीत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला ते माजी आमदार दिनकर माने यंदा मात्र पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने दिनकर माने यांचे तगडे आव्हान आमदार अभिमन्यू पवारासमोर आहे. माने यांचे आव्हान पेलण्यासाठी त्यांना आता मुत्सद्दी आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले बसवराज पाटलांची साथ लाभत असल्याने माने यांचे चक्रव्यूह भेदण्यासाठी बसवराज पाटील ब्रह्मस्त्र ठरू शकतात. त्या दृष्टीने आमदार पवारांनी बसवराज पाटील आणि त्यांच्या टीमशी ट्युनिंग जुळविण्यास सुरुवात केली आहे.

कामाची पद्धत आणि सरकारी दरबारी असलेले वजन या आमदार अभिमन्यू पवारांच्या जमेच्या बाजू आहेत. औसा मतदारसंघात त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे आणि त्यासाठी आणलेला निधी या जोरावर ते मतदारांना सामोरे जात आहेत. (BJP) एकीकडे मराठा समाजात सुरू असलेला जरांगे फॅक्टर आणि दुसरीकडे भाजपपासून दूर जात असलेला मुस्लिम मतदार यावर आमदार अभिमन्यू पवार बसवराज पाटील यांच्या साथीने मात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विरोधी उमेदवार दिनकर माने यांची मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे लिंगायत समाजाची मते आपल्याकडे वळविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांना बसवराज पाटलांची मोठी मदत होऊ शकते. बसवराज पाटलांच्या पराभवानंतरही औसा मतदारसंघातील लोकांनी त्यांच्याशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.

मानेकडे झुकणाऱ्या मुस्लिम, मराठा समाजाच्या मतांची लीड कमी करायची असेल तर इतर मते आपल्या पारड्यात पाडून घेणे क्रमप्राप्त आहे. या बाबत आमदार अभिमन्यू पवारांना बसवराज पाटील नक्कीच मार्गदर्शन करून त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आणतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. बसवराज पाटलांच्या साथीने पवारांची तटबंदी मजबूत झाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT