Mumbai News, 03 Nov : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मात्र, फडणवीसांची सुरक्षा वाढवल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी टीका करायला सुरूवात केली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी तर गृहमंत्र्यांनी स्वत:ची सुरक्षा वाढवून जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका केली आहे. तर राऊतांच्या आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, "संजय राऊत हे शोले पिक्चरमधील असरानी आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील जनता त्यांची मजा घेते. लोक त्यांच्याकडे हास्य विनोदाने पाहतात." अशा शब्दात त्यांनी राऊतांना डिवचलं आहे.
राज्यात खून, बलात्कार, कोयता गँग, खंडण्या, मारामाऱ्या, लुटमारीच्या घटना घडत असताना अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:च्या सुरक्षेत वाढ केली. त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी फोर्स वनचे जवान तैनात केले आहेत.
पण आम्हाला समजायला हवं की, त्यांना कोणापासून धोका आहे. त्यांनी आपल्या सुरक्षेत एवढी मोठी वाढ का केली? राज्याचे गृहमंत्र्यांनी स्वत:ची सुरक्षा वाढवली मात्र जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे." अशी शब्दात राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांवर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.