Raj Thackeray's convoy
Raj Thackeray's convoy Sarkarnama
मराठवाडा

राज ठाकरेंच्या ताफ्याला दुसऱ्यांदा अपघात; पुणे शहराध्यक्ष बाबरांच्या गाडीचा समावेश

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा आज (ता. ३० एप्रिल) दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. याअगोदर तो नगर जिल्ह्यात शहराच्या पुढे घोडेगावजवळ झाला होता. आता दुसरा अपघात हा औरंगाबादजवळ (Aurangabad) झाला आहे. दुसरा अपघात हा मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या गाडीला झाला आहे. त्यात सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे. (Accident for the second time to Raj Thackeray's convoy)

राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे, त्यासाठी आज पुण्यातून शंभर गाड्यांच्या ताफ्यासह ते औरंगाबादला रवाना झाले आहेत. मात्र, त्या सभेला पोचण्यापूर्वीच त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना दोनदा अपघात झाला आहे. पहिला अपघात हा नगर शहराच्या पुढे गेल्यानंतर घोडेगावजवळ झाला होता. त्यात ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

दुसरा अपघात हा औरंगाबादजवळ झाला आहे. त्यातही सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामध्ये पुणे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीचाही समावेश आहे. यामध्ये कोणी जखमी असल्याचे वृत्त नाही. मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद येथील सभा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पुण्यातील सुमारे दीडशे पुरोहितांकडून त्यांना आशीर्वाद देण्यात आला आहे. त्यासाठी चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वाचे पठण करण्यात आले आहे. "राज ठाकरे यांना यश मिळावे. त्यांची सभा निर्विघ्न पार पडावी. त्यांच्या विजयी वाटचालीस सुरुवात व्हावी. या हेतूने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांच्या माध्यमातून आशीर्वाद दिले," असे मनोज पारगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT