Chhatrapati Sambhajinagar APMC News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar APMC : विरोधकांकडून आरोप, तरी सभपती पदासाठी बागडेंचा पठाडेंवरच विश्वास..

Marathwda : पठाडे, चौधरी विजयी झाल्यानंतर भाजप-शिंदे युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

प्रकाश बनकर

Bjp : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या (Chhatrapati Sambhajinagar APMC) सभापती पदी भाजपचे राधाकिशन पठाडे यांची तर उपसभापती पदी शिंदे गटाचे मुरली चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. १४ विरुद्ध ४ अशा मतांनी हे दोघेही विजयी झाले. भाजप-शिंदे गट युतीने बाजार समितीतील १८ पैकी ११ आणि ती हमाल, मापाडी, व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेल्या संचालकांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे १४ जागा जिंकल्या.

सभापती पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा असल्याने आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी १४ संचालकांना गुजरात सहलीवर पाठवत काळजी घेतली. (Bjp)भाजपकडून माजी सभापती राधाकिशन पठाडे, श्रीराम शेळके आणि निवडणुकीत युतीच्या पॅनलमधून लढलेले अभिजीत देशमुख इच्छूक होते. त्यामुळे बागडे कोणाच्या नावाला पंसती देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

माजी सभापती राधाकिशन पठाडे हे बागडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. (APMC Election) त्यामुळे याआधी देखील त्यांना सभापती पदावर संधी देण्यात आली होती. आता पुन्हा बागडे यांनी पठाडे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे संचलाक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पठाडे यांच्यावर एकापाठोपाठ एक संकट येत होती.

महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ काळे यांनी पठाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. तर पठाडे यांनी देखील काळे हे व्यापारी आणि त्यांच्या नावावर गाळा असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत राजकारण चांगलेच तापले होते.

त्यानंतर आमदार बागडे, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी समन्वयातून पॅनल उभे केले. १८ पैकी ११ जिंकत बहुमत मिळवले. तीन संचालकांनी युतीला पाठिंबा दिल्यामुळे हा आकडा चौदावर पोहचला. गुजरात सहलीवर गेलेले १४ संचालक आज शहरात परतले आणि सकाळी सभापती-उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली.

भाजपकडून राधाकिशन पठाडे यांनी सभापती पदासाठी व मुरली चौधरी यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले आणि सभापती कोण होणार याचा सस्पेन्स संपला. बागडे यांनी पठाडे यांच्याच नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले.

तर महाविकास आघाडीने जगन्नाथ काळे आणि महेंद्र खोतकर यांना अनुक्रमे सभापती, उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली होती. बहुमत असल्यामुळे पठाडे आणि चौधरी या दोघांचाही विजय निश्चित समजला जात होता. प्रत्यक्षात घडलेही तसे. पठाडे, चौधरी विजयी झाल्यानंतर भाजप-शिंदे युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT