Mp Hemant Patil On Gadkari : गडकरी पंतप्रधान व्हावेत, शिंदे गटाच्या खासदाराची इच्छा..

Shivsena : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या नऊ वर्षात देशातील रस्ते चकाचक केले आहेत.
Mp Hemant Patil On Gadkari News
Mp Hemant Patil On Gadkari NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात जे रस्त्यांचे, महामार्गांचे जाळे तयार केले आहे, ते पाहता सामान्य रिक्षावाल्याच्या तोंडी देखील त्यांचे नाव आहे. (Mp Hemant Patil On Gadkari ) नितीन गडकरी यांच्या रुपाने देशाला मराठी पंतप्रधान मिळावा, असे साकडे आपण रेणुका मातेला घातले असल्याचे शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर भाषणात सांगितले.

Mp Hemant Patil On Gadkari News
March On Minister Bhumres Residence : अतिक्रमण काढले, आता राहायला घरं द्या; भुमरेंच्या घरावर मोर्चा धडकला..

मोदी यांना २०२४ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अख्खी (Marathwada) भाजप कामाला लागली आहे. राज्यात शिंदे आणि भाजप युतीचे सरकार सत्तेवर आहे. असे असतांना शिवसेनेच्या खासदाराने पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींच्या नावाला पंसती दर्शवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

माहूरगड येथे नुकतेच नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते स्कायवाॅक आणि लिफ्टच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) देखील उपस्थितीत होते. भुमीपूजन झाल्यानंतर नेत्यांची भाषणं झाली, यावेळी हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. हेमंत पाटील यांनी चक्क नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत, असे साकडे रेणुकादेवीला घातले.

पाटील म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या नऊ वर्षात देशातील रस्ते चकाचक केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकच काय पण रिक्षावाला देखील गडकरींच्या कामाचे कौतुक करतांना दिसतो. केंद्रातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरीसाहेब ओळखले जातात. त्यांच्या कामाचा प्रभाव सत्ताधारी मंत्री, खासदारांवर तर आहेच, पण विरोधकही त्यांचे कौतुक करतांना दिसतात.

गडकरी यांच्या सारखा नेता, मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर पहायला नक्कीच आवडेल. मी तर रेणुकादेवीला गडकरी पंतप्रधान व्हावेत, असे साकडे घातल्याचे पाटील यांनी भाषणात सांगितले. आता गडकरींबद्दल पाटील यांनी साकडे घातले असले तरी त्यामुळे गडकरी आणि स्वतः पाटील यांची देखील अडचण वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com