Dhananjay Munde-Sandip Kshirsagar News Beed Sarkarnama
मराठवाडा

Sandip Kshirsagar On Dhananjay Munde : आरोपी जवळचे असले तरी दोन दिवसात गुन्हा नोंद अन् अटक! मी तुमच्यासारखा पळून गेलो नाही..

MLA Sandeep Kshirsagar assures that the accused will be arrested within two days and confirms discussions with police regarding the investigation. : दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका.

Jagdish Pansare

Beed Political News : बीड लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपी माझ्या जवळचे असले तरी तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवसात गुन्हा दाखल होऊन ते अटकेत आहेत. या प्रकरणाचा तपास योगपद्धतीने सुरू आहे की नाही यासाठी आम्ही पोलीस यंत्रणेशी चर्चा करतो आहोत. आरोपी माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका, असं मी सांगितलं आहे असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

मी कुठेही गेलो नाही, तुमच्यासारखा दिडशे दिवस लपून बसलो नाही, असा टोलाही त्यांनी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लगावला. बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. आरोपींवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हॅन्ड असल्याचा आरोप करण्यात आला.

त्यांनीच त्याला बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष केले होते. विजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यासोबत होता. पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडीलांना वीस फोन करण्यात आले, असा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. या सगळ्या आरोप आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर शांत असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले. घडलेला प्रकार चुकीचा आहे, याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी या धनंजय मुंडे यांच्या मागणीशी मी ही सहमत आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका, असं मी सांगितलं आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करायला 10 दिवस लागले नाही. माझ्या जवळचे असले तरी पीडिताने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे. मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी लगावला. या प्रकरणात पोलीस तत्परतेने कारवाई करत आहेत. मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे. मस्साजोग प्रकरणी मुंडे बोलले की, 150 दिवस बाहेर राहावं लागलं, त्यांचे मंत्रीपद गेलंय, त्यामुळे त्यांना दुःख आहे. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत, पीडितेकडे मी जाणार होतो. मात्र, आताच जाणं योग्य नाही, त्यामुळे तिथे गेलो नाही, असे संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT