Dhanajay Munde : …तर मंत्रिपदच काय धनंजय मुंडेंची आमदारकीही जाईल? हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पोहचवली कागदपत्रे

Anjali Damania Mumbai High Court Chif Justice Rashmi Shukla : अंजली दमानिया यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.
Dhananjay Munde, Mumbai High Court
Dhananjay Munde, Mumbai High CourtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याबाबत त्यांच्याकडून सोशल मीडियात सातत्याने काही फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे पोस्ट केली जात आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्या निशाणा साधत आहेत.

आता दमानिया यांनी काही कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियातून दिली आहे. मी जी कागदपत्रे दिली आहेत ते Office of profit चे आहेत. याचा योग्य तपास झाला तर मंत्रिपदच काय धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाईल, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

Dhananjay Munde, Mumbai High Court
Chandrashekhar Bawankule : सैफ अली खानवरच्या प्राणघातक हल्ल्यावर भाजपमध्ये शंका-कुशंका

दमानिया यांनी बुधवारी मुख्य न्यायाधीश आणि पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यांना जवळपास 40 कागदपत्रे दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कागदपत्रांमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेवर यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती आहे. तसेच मुंडे व त्यांच्य पत्नीशी संबंधितही काही माहिती देण्यात आली आहे.

मुंडे यांच्यासोबरतचे आरोपींचे फोटोही कागदपत्रांमध्ये आहेत. तसेच जगमित्र साखर कारखान्याची माहितीही सोबत जोडण्यात आली आहे. याचाच योग्य तपास करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात व्हावी, सर्व आरोपींना मुंबईतील कारागृहा ठेवावे, अशी मागणीही दमानिया यांनी मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे.

Dhananjay Munde, Mumbai High Court
Pune Murder Case: धक्कादायक: पुणं हादरलं! कात्रीनं पत्नीचा खून करुन पतीनं केला व्हिडिओ व्हायरल

देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कोर्टाच्या निगराणीखाली व्हावा आणि तपासाची माहिती दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी महत्वाची मागणीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात एसीबी आणि ईडी चौकशी आदेश देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयोगालाही चौकशी करण्याचे आदेश द्यावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com