Shivsena : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपण या महाराष्ट्राला सुर्वण वैभवी काळाकडे घेवून जात होतो. कृषी, उद्योग या राज्याच्या डबल इंजिनच्या सहाय्याने आपण शेतकरी, तरुणांना सुखी करण्याचे प्रयत्न करत होतो. पण हे काही लोकांना खूपत होतं. म्हणून त्यांनी आपल्यातील चाळीस जणांना गद्दारी करायला लावली. त्या गद्दारांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या पाठीत चाळीस वार केले आणि आपले सरकार पाडले.
पण दोन महिने त्रास सहन करा, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे सगळे गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवासेनेचे अध्यक्ष (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी दिला. आमचा संविधान, देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. (Shivsena) नक्कीच आपल्याला न्या मिळणार आणि हे घटनाबाह्य सरकार कोसळणार, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित सभेत बिडकीन येथे बोलतांना ठाकरेंनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावरही टीका केली. स्वतःला शेतकरी म्हणवणारे वाईन बार उघडत फिरत आहे, त्यांना जास्त किंमत देवू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. आदित्य ठाकरे म्हणाले, या राज्यातला शेतकरी, तरुण आज हाताला काम नाही म्हणून हैराण आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना आम्ही शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमुक्ती दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली.
पीकांच्या नुकसान भरपाईपोटी मदतीची तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवली. पण गद्दारांनी आपले सरकार पाडले आणि ते राहून गेले. यांनी पुन्हा तीच घोषणा केली पण अद्याप शेतकऱ्याला नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. ती परिस्थिती तरूणांची झाली आहे. त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून आपले सरकार असतांना आम्ही मोठे उद्योग राज्यात आणले, त्यातून लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार होते.
पण सरकार गेल्यानंतर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी हे सगळे उद्योग गुजरातला भेट म्हणून दिले. या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी म्हणे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर तयार केले आहेत. वाईन शाॅपचे गाडी स्लो झाली की दिसले पाहिजे आणि मग.. पण त्यांना जास्त किमंत देवू नका. काही दिवस त्रास सहन करा, पुन्हा राज्यात आपले सरकार येणार आहे. तेव्हा आपण पुन्हा राज्याला विकासाच्या मार्गावर घेवून जावू.
पण एक लक्षात ठेवा ज्या ४० गद्दारांना उद्धव ठाकरेंनी आमदार, खासदार, मंत्री केले, पाच-पाचवेळा उमेदवारी देवून निवडून आणले ते ५० खोके घेवून गद्दार झाले. ते निवडणूकीत याच खोक्यांचा पैसा वापरून तुमची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांना तुमच्या पापाचा पैसा आम्हाला नको, असे सांगत त्यांची जागा दाखवा.
माझ्याकडे सध्या तुम्हाला द्यायला काही नाही, मी तुम्हाला द्यायला नाही, तर मागायला आलो आहे. याआधी जसे आशिर्वाद तुमचे माझ्या, शिवसेनेच्या आणि उद्धवसाहेबांच्या पाठीशी होते, तसेच ते कायम ठेवा, या राज्यात पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.