MP Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

MP Sandipan Bhumre News : खासदार झाल्यावर संदिपान भुमरे यांचे पहिलेच पत्र विमानतळाच्या विस्तारीकरणाचे !

Sandipan Bhumre Meet Union Minister Of Aviation : छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचे विस्तारीकरण व विकासासाठी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघातील विकास प्रश्नांवर पहिलेच पत्र नागरी उड्डाण खात्याच्या मंत्र्यांना दिले आहे. मराठवाड्याची व राज्याची पर्यटन राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग द्यावा,अशी मागणी करणारे पत्र खासदार भुमरे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना देत आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचे विस्तारीकरण व विकासासाठी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhr Mohol) यांची भेट घेऊन विमानतळाच्या विकासासाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करावी, अशी विनंती संदिपान भुमरे यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर मधून तब्बल 1 लाख 35 हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत.त्यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. निवडणूक प्रचारादरम्यान संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांनी गेल्या वीस वर्षात संभाजीनगर जिल्ह्याचे वाटोळे केले, असा आरोप केला होता.

खैरे यांनी वीस वर्षात जिल्ह्यात केलेले एक काम दाखवावे, असे आव्हान देखील भुमरे यांनी दिले होते. त्यामुळे साहजिकच आता पहिल्यांदाच खासदार झालेल्या संदिपान भुमरे यांच्या कामावर जिल्ह्यातील मतदार तर लक्ष ठेवतीलच पण त्याहीपेक्षा अधिक विरोधक त्याकडे बारकाईने पाहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

याशिवाय जागतिक वारसा असलेल्या अजिंठा, वेरूळ या ऐतिहासिक लेण्यांमुळे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून संभाजीनगरला जागतिक पातळीवर महत्त्व आहे. औद्योगिक आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण होणे, विमानांची संख्या वाढवणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. इम्तियाज जलील (Imtiyaz jaleel) खासदार असताना त्यांनीही या दृष्टीने प्रयत्न केले होते.आता नव्याने खासदार झालेल्या संदिपान भुमरे यांच्यावर ही जबाबदारी येऊन ठेपली आहे.

खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात भुमरे यांनी मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे त्यांच्या पहिल्या पत्रावरून स्पष्ट होते. संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरण व इतर सुविधांच्या कामासाठी संबंधित मंत्री कधी बैठक घेतात आणि भुमरे यांच्या पत्राला किती यश मिळते हे पाहावे लागणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT