Shivsena and Vaijapur Vidhan Sabha : लोकसभेला भुमरेंना मताधिक्य, तरीही शिवसेनेसाठी सोपी नसणार वैजापूर विधानसभेची निवडणूक!

Ramesh Bornare and Vaijapur Vidhan Sabha Election : ...त्यामुळे वैजापूर मतदारंसघ राखताना विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची दमछाक होऊ शकते.
MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
MLA Ramesh Bornare - MP Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Vaijapur Vidhan Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील वैजापूर, कन्नड-सोयगाव, गंगापूर-खुलताबाद या तीनही मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे यांना मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांना मराठा असल्याचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. कारण, संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून सरकारविरोधातील नाराजी निकालातून दिसून आली आहे.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मात्र याच मराठा आरक्षणाच्या मुद्य्याने संदीपान भुमरे(Sandipan Bhumare) यांना नुसतेच तारले नाही, तर तब्बल 1 लाख 35 हजारांचे मताधिक्य मिळवून दिल्याचे दिसते. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून भुमरे यांना तब्बल 95 हजार मते मिळाली. शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना त्याचे श्रेय दिले जात असले तरी मराठा म्हणून भुमरे यांना हे मतदान झाले हे कुठंतरी नाकारून चालणार नाही.

MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
Vaijapur Asseembly Constituency: खासदार भुमरेंचा पहिला सत्कार आमदार बोरनारेंच्या मतदारसंघातच !

अर्थात सत्ताधारी आमदार म्हणून बोरनारे(Ramesh Bornare) यांचा त्यात निश्चित वाटा आहे. परंतु लोकसभेची परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना लोकसभेतील चित्र विधानसभा निवडणुकीत नसले याची कल्पना आहे. त्यामुळे वैजापूर मतदारंसघ राखताना विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची दमछाक होऊ शकते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला प्रा. रमेश बोरनारे यांनी साथ देण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांना या नाराजीचा फटका अनेकदा बसला. अगदी अनेक भागात बोरनारे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंगही उद्भवले.

शिवसेनेकडून(Shivsena) पहिल्याच प्रयत्नात विधानसभेवर निवडून गेलेल्या बोरनारे यांनी पक्षाशी, उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील स्थानकि शिवसेना नेत्यांनी बोरनारे यांची नाकाबंदी सुरू केली होती. राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवर यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा त्या नाकाबंदीचाच एक भाग होता, असे बोलले जाते.

चिकटगावकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नुकतीच भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वैजापूरमधून चिकटगांवकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

MLA Ramesh Bornare -  MP Sandipan Bhumre
Ramesh Bornare : भुमरेंना लीड देत आमदार बोरनारे ठरले भारी; विधानसभेचे तिकीट फायनल?

असे झाले तर वैजापूरमध्ये बोरनारे विरुद्ध चिकटगांवकर अशी काँटे की टक्कर होऊ शकते. बोरनारे यांनी सत्ताधारी पक्षात गेल्याचा बराच फायदा मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठी करून घेतला. सर्वाधिक निधी आणल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. बोरनारे यांच्यासाठी ही जमेची बाजू असली तरी त्यांना मतदारसंघ राखणे वाटते तितके सोपे नाही, असंही दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com