K chandrashekhar rao sarkarnama
मराठवाडा

Ahmadpur Political News : तेलंगणातील केसीआर यांच्या पराभवाने महाराष्ट्रात घालमेल

Umesh Bambare-Patil

प्रशांत शेटे -

Ahmadpur Political News : तेलंगणा राज्यात मागील दोन वेळेस सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. या वेळीही तेलंगणा राज्यात त्यांचा करिष्मा पाहावयास न मिळाल्याने तेथे केलेल्या कामाच्या बाता मारत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना बीआरएस पक्षात येण्याचा सल्ला देणाऱ्या केसीआर यांच्या अपयशाने महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांची मोठी पंचायत होऊन बसली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यापुढे केसीआर यांची जादू चालणार नसल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते बुचकुळ्यात पडले आहेत. तेलंगणा Telangana राज्यात मागील दहा वर्षांपासून शेतकऱ्यांविषयी हिताचे निर्णय घेतल्याच्या बाता मारून महाराष्ट्रातील नेत्यांना विकासकामांचे धडे देत पक्षात येण्याची भुरळ घालणाऱ्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव K Chandrashekhar Rao यांच्या बीआरएस पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे.

मुख्यमंत्री केसीआर यांनी मोठा फौजफाटा पंढरपूर येथे आणून शक्तिप्रदर्शन केले होते. मराठवाड्यात माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली चाकूर Chakur- अहमदपुर विधानसभा मतदारसंघातून काही कार्यकर्ते विधानसभेची तयारी सुरू करू लागले. त्यानिमित्ताने मतदारसंघातील अनेक गावात दररोज बीआरएस पक्षात प्रवेशाचे सोहळे पार पडू लागले.

त्यामध्ये त्यांच्या उठवून उभे केले होते. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुक निकालामध्ये बीआरएस पक्षाला अपयश आले आणि जनतेने पक्षाला नाकारून काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची जादू त्यांच्याच राज्यात चालली नाही तर महाराष्ट्रात कशी चालेल या विचाराने कार्यकर्ते बुचकुळ्यात पडले आहेत. बीआरएस पक्षाकडून निवडणुक लढविणे धोक्याचे होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने कार्यकर्ते पर्यायी पक्षाच्या शोधात आहेत.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT