Manoj Jarange And Anjali Damania Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange And Anjali Damania : बीड प्रकरण उचलून धरणाऱ्या दमानिया अन् जरांगेंच्या अडचणी मुंडे समर्थकांनी वाढवल्या; आता 'या' शहरात गुन्हा दाखल

Minister Dhananjay Munde Beed Santosh Deshmukh murder case Manoj Jarange Anjali Damania Kingaon Police Station : मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात मंत्री धनंजय मुंडे समर्थक आक्रमक असून, जरांगे आणि दमानियांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरूच आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी काढलेल्या मोर्चात मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक टीका केली होती. त्यानंतर जरांगेंविरोधात मुंडे समर्थकांनी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालवला आहे.

मनोज जरांगेंविरोधात आजही नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि जरांगेंविरोधात लातूरमधील किनगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परभणीतील मोर्चात मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केली. याचे राज्यभर पडसाद उमटले. बीडमधील परळी, शिवाजीनगर, अंबाजोगाई आणि धारूर इथं जरांगेंविरोधात गुन्हे दाखल झाले. यानंतर आता नांदेडच्या माळाकोळी पोलिस ठाण्यात जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या लोकांना घरात घुसून मारण्याची धमकीवजा भाषा वापरली. यामुळे सकल ओबीसी (OBC) समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊली गीते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

दमानिया आणि जरांगेंविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल

याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ सुरू असल्याचे म्हटले होते. यावर मुंडे समर्थक आक्रमक झाले. यानंतर दमानिया यांच्याविरोधात लातूरमधील किनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मनोज जरांगे यांचा देखील तक्रारीत समावेश केला आहे. किशोर गंगारामजी मुंडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कलम 352 351/2, 351/3, आणि 3(5) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धस,सोळुंके अन् क्षीरसागर यांच्यावर टीका

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून बीड जिल्ह्यातील तीन टगे जातीय द्वेष निर्माण करत आहेत, असं म्हणत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र डागले. यावेळी पोटभरे यांनी मनोज जरांगे यांच्यावर देखील निशाणा साधला.

तर विरोधात आंदोलन करणार

बीड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. ते आता जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात आता आम्ही आंदोलन करू, हे जर त्यांनी थांबवलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. त्यांचे व्यक्तिगत राजकारण आहे ते त्यांनी करावं, असंही बाबुराव पोटभरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT