Pankaja Munde, Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "जरांगेंचं आंदोलन केवळ पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी...''; OBC नेत्याचा आजपर्यंतचा सर्वात मोठा आरोप

Jagdish Patil

Beed News, 24 July : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तणावाचं वातावरण आहे. शिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे.

तर दुसरीकडे ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी काहीही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका घेतली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं आमरण उपोषण स्थगित करत सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे.

मात्र, जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करताच लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगेंना डिवचलं आहे. "मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची मागणीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांना हे आंदोलन स्थगित करावं लागलं. त्यांचं आंदोलन हे पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी होतं," अशा शब्दात हाके यांनी जरांगेंवर टीका केली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, "मनोज जरांगे यांची मागणीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांना आपलं आंदोलन स्थगित करावं लागलं. आरक्षणाच्या नावाखाली ते वर्चस्ववादाची लढाई लढत आहेत. त्यांचे आंदोलन हे बेकायदेशीर आमि संविधान विरोधी आहे. त्यांचे आंदोलन हे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करण्यासाठी होतं, त्यांचे आंदोलन महादेव जानकर यांचा पराभव करण्यासाठी होतं.

अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी आपली मागणी पुढे नेल्यामुळे त्यांना आंदोलन मागे घ्यावे लागलं, स्थगित करावे लागलं, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हाके सध्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यात आहेत. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. तर हाके यांच्या दौऱ्याला बीडमधून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT