NCP leader Kumar Wakale celebrates after being elected unopposed from Ward No. 8D in the ahilyanagar Municipal Election, marking a key political development. Sarkarnama
मराठवाडा

NCP Ajit Pawar : भाजप, शिवसेनेपाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही बाजी मारली; 'या' महापालिकेत पहिला उमेदवार बिनविरोध

NCP Candidate Unopposed Win : बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले. तर कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध ठरला होता.

Jagdish Patil

Ahilyanagar News, 01 Jan : राज्यभरात महापालिका निवडणुकीत रणधुमाळी जोरदार सुरू आहे. त्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्षाकडून आपापले उमेदवार विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजपचे राज्यभरात जवळपास 6 उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत.

त्यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपचे तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर धुळे महापालिकेत 2 तर पनवेल महापालिकेत 1 असे भाजपचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यात जमा आहेत.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एक उमेदवार अहिल्यानगर महापालिकेमध्ये बिनविरोध विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने खाते उघडले असून राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्र.8 ड मधून बिनविरोध निवड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले. तर कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध ठरला होता. मात्र, आज या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे अजितदादांच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे.

त्यामुळे आता राज्यभरात एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवड झालेत. त्यामध्ये, भाजपचे 6 आणि जळगाव महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एक उमेदवाराचा समावेश आहे.

दरम्यान, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण शिंदेसेनेच्या 54 पैकी पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे हा पक्षासाठी निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT