Sangli Municipal Election : इच्छुकांच्या मनधरणीसाठी CM फडणवीस सांगलीत येणार, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार...

Sangli Miraj Kupwad Corporation : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणूक मैदानात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने आणि तयारीने उतरत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची आखणी सुरू आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते निवडणुक प्रचारात येण्याचे नियोजन सांगली भाजपकडून करण्यात आले आहे.
CM Devendra Fadnavis and Chandrakant Patil
CM Devendra Fadnavis and Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 01 Jan : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. त्यातच बंडखोरीचे प्रमाण देखील वाढलं आहे. मात्र हीच बंडखोरी थांबवण्यासाठी भाजपच्या जिल्हास्तरावरून ते राज्यस्तरावरून मोठे हालचाली सुरू आहेत.

येत्या दोन दिवसात अर्ज माघार घेण्यासाठी हालचाली असणार आहेत. या हालचालीनंतर पुढील बारा दिवस या इच्छुकांना घेऊन मनधरणीसाठी सांगली भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांनाच पहिल्या दिवशी प्रचार शुभारंभाला निमंत्रण देण्यात आलं आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर शनिवारी तीन जानेवारीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळ फोडून सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

"सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणूक मैदानात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने आणि तयारीने उतरत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची आखणी सुरू आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते निवडणुक प्रचारात येण्याचे नियोजन सांगली भाजपकडून करण्यात आले आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरू आहे.

CM Devendra Fadnavis and Chandrakant Patil
Ajit Pawar NCP : 'ते आमचे उमेदवारच नव्हेत..' गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर अजित पवारांचं भलतंच स्पष्टीकरण...

इच्छुकांची प्रचंड संख्या आणि त्यांची, तसेच त्यांच्या समर्थकांची आग्रही मागणी अशा वातावरणात भाजपने उमेदवार निश्चितीसाठीची कसरत यशस्वीपणे पार पाडली आहे. या काळात नाराज इच्छुकांबरोबर संपर्काचे प्रयत्न सुरू होते. नेते, पदाधिकाऱ्यांची त्यासाठी धावपळ सुरू होती. नाराज इच्छुक आणि कार्यकर्त्यांबरोबर भेटी सुरू होत्या.

CM Devendra Fadnavis and Chandrakant Patil
PMC Election 2026 : बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाबरोबर भाजपची युती झाली आहे. त्याचवेळी जनसुराज्य पक्षाबरोबर काही जागांसाठीची युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील असे नेते मकरंद देशपांडे त्यांनी सांगितले आहे. पक्ष पूर्ण तयारीने आणि शक्तीने या महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे.

पालिका क्षेत्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. पुढील दहा वर्षांच्या विकासाचे व्हिजन ठरवले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार पुढील कामाचे नियोजन करण्यात येत आहे. पालिकेच्या प्रत्येक प्रभागात इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. त्यातूनही समन्वय साधत पक्षाने उमेदवार निश्चित केले असल्याचे देशपांडे म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com