AIMIM corporator arrest Sarkarnama
मराठवाडा

AIMIM corporator arrest : 'AIMIM'ला दुहेरी झटका! मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर, तर दुसरा नगरसेवक थेट जेलमध्ये!

AIMIM corporator Matin Patel remains under scrutin Nida Khan case, another corporator Mehraj Khan arrested fake birth certificate case linked concealment third child : छत्रपती संभाजीनगरमधील 'AIMIM'चे मतीन पटेलपाठोपाठ नगरसेवक मेहराज खान तिसऱ्या अपत्यावरून, अडचणीत आले आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : AIMIMचा नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव इथल्या अनधिकृत घरावर महापालिकेने आज भल्या पहाटे बुलडोझर चालवला. त्याआधीच AIMIMला दुसरा धक्का बसला तो, नगरसेवक मेहराज खान यांच्या अटकेने!

महापालिका निवडणुक लढवताना तिसऱ्या आपत्याची माहिती लपवण्यासाठी बनावट जन्मदाखला तयार केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह सात जणांना अटक केली आहे.

निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू नये म्हणून तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्यासाठी मेहराज खान याने बनावट जन्मदाखला तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात AIMIMचा विद्यमान नगरसेवक मेहराज खान जलील खान याच्यासह पत्नी निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान तसेच हा दाखला ज्या शाळेतून देण्यात आला त्या शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी, सज्जू उस्ताद आणि अहमद खान मेहराज खान, अशा सात जणांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक मनीषा हिवराळे यांनीच फिर्याद दिली असून पुढील कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIMच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नगरसेवक मतीन पटेल याचे घर आणि कार्यालय आज सकाळी बुलडोझरने भुईसपाट करण्यात आले. या कारवाईने एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये संताप आहे. या कारवाईच्या विरोधात इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची दुपारी भेट घेतली.

हे प्रकरण ताजे असतानाच AIMIMचे नगरसेवक मेहराज खान जलील खान पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपवणे, खोट्या जन्म प्रमाणपत्र दाखल्यावर बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे आणि खोटी माहिती सादर करून निवडणूक लढवल्याचा मेराज खान याच्यावर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेहराज खान याच्यासह एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली असून आणखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलीस उपआयुक्त पंकज अंतुलकर यांनी दिली आहे.

असे फुटले बनावटगिरीचे बिंग

छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक कार्पोरेट जिहाद मधील आरोपी निदा खानला लपवण्यामध्ये AIMIMच्या नगरसेवक मतीन पटेल याचा हात असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण निस्तारतांना इम्तियाज जलील व पक्षाच्या नगरसेवकांच्या नाकीनऊ येत असतानच AIMIMच्या आणखी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली. महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचा नियम धाब्यावर बसवून, स्वत:च्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

नातेवाइकांसह सात जणांविरोधात गुन्हा

यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून शासनाची आणि मनपाची फसवणूक केल्याचा मेहराज खान याच्यावर आरोप आहे. त्याची पत्नी, भाऊ, भावजय आणि एका शाळेच्या मुख्याध्यापकासह सात जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या तपासातून या संपूर्ण बनावटगिरीचे बिंग फुटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT