Aurangabad name change controversy : औरंगाबादच्या नामांतरचा लढा तब्बल 19 वर्षांपासून सुरू आहे. यानंतर सरकारने छत्रपती संभाजीनगर, असे नामकरण केलं. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचं नाव 'छत्रपती संभाजीनगर', असं करण्यात आल्याच्या निर्णयाला 'AIMIM'चे इम्तियाज जलीलांचा प्रखर विरोध आहे.
यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल 14 दिवस साखळी उपोषण केलं होते. इम्तियाज जलील यांनी नामांतराची लढाई सुप्रीम कोर्टात नेण्याची तयारी केली होती. या नामांतरला विरोध का आहे? यावर इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं.
'AIMIM'चे इम्तियाज जलील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या सरकारनामा डिजिटलशी संवाद साधला. जवळपास एक तसांच्या संवादात त्यांनी औरंगाबाद हा उल्लेख कायम ठेवला. याचे कारण सांगताना त्यांनी राजकारण्यांच्या लबाडगिरी टार्गेट केली. औरंगाबादची ओळख ही आतंरराष्ट्रीय पातळीवर असताना, ती पुसणे सोपं नाही, असं ठामपणे इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
'छत्रपती संभाजीनगर' या नावाला विरोध का? या प्रश्नांवर उत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले, "मी याचे दोन हजार वेळा उत्तर दिले आहे. मी मुस्लिम (Muslim) असल्यामुळे माझ्या विरोधाला त्यादृष्टीने पाहिले जाते. वास्तविक. माझा महापुरूषांच्या नावाला विरोध नाही. ते आमचे आदर्श आहेत". परंतु लबाड राजकारण्यांनी त्यांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजली. त्याला मला खूप राग आहे, त्याची चिडचिड होते, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.
'ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबादची (छत्रपती संभाजीनगर) आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. ही ओळख पुसणे सोपे नाही. आपल्याकडे इतर कोणते मुद्दे नाहीत का? मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सुशिक्षित बेरोजगार, महिलांवर अन्याय असे सर्व प्रश्न सुटलेत का? रस्ते-पाणी सर्व मुलभूत सुविधा मिळत आहेत का? याचे उत्तर हो असेल तर नामांतर सारखे मुद्दे चालतील', असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.
आता 'नामांतर' होऊन देखील दहा-दहा दिवस शहराला पाणी येत नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यावर कोण बोलणार? निवडणुका आल्या की, खरे प्रश्न बाजूला ठेवून हिरवा-भगवा करून लोकांना वेड्यात काढायचे. इतिहास आणि महापुरूष महत्त्वाचे मानत असाल, तर पुण्याचे नाव सावित्रीबाई फुले करा, दीक्षा भूमी असल्यामुळे नागपूरचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर करा आणि कोल्हापूरचे नाव छत्रपती शाहू महाराजांवरून ठेवा, असे प्रति आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले.
मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचं सांगितलं होतं, तशी घोषणा देखील सरकारने केली होती. पण अजूनपर्यंत एकही वीटसुद्धा तिथं ठेवली नाही, याची आठवण करून देत इम्तियाज जलील यांनी सरकारला टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.