Nilesh Lanke: धीर धरा, आपण अजून अंड्यात आहात! 'अजितदादांच्या सोबत चला,' म्हणणाऱ्या नेत्यांना लंकेंचा टोला

Nilesh Lanke’s Sharp Remarks Shake NCP : वाटलं नव्हत आमदार होईल..पण शरद पवार साहेबांमुळे मी आमदार झालो.मी आमदार झाल्यावर चिमटा घेऊन चेक केलं खरच झालो काय..खासदार झाल्यानंतर देखील तीच परिस्थिती होती, हे सगळं शरद पवारांच्या ताकदीमुळे झालं.
sharad pawara nilesh lanke
sharad pawara nilesh lankesarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सध्या चर्चा सुरू आहे, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते हे अजित पवारांबरोबर चला, असा आग्रह धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा नेत्यांना खासदार निलेश लंके यांनी आज चांगलचं सुनावलं.

पुण्यातील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लंके बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीला ज्यांची यंत्रणा बारानंतर सुरू होते, असे खासदार निलेश लंके अशी त्यांची ओळख करून दिली देण्यात आली. त्यानंतर ते भाषणाला उभे राहिल्यानंतर म्हणाले, "रात्री बारानंतर देखील कोणीतरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजेत. दिवसा तर कोणीही कार्यकर्ते सांभाळतो, मात्र जो रात्री बारानंतर कार्यकर्ते सांभाळतो.तो खरा साहेबांचा कार्यकर्ता,असे निलेश लंके म्हणाले.

जो संघर्षाच्या काळात आणि अडचणीच्या काळात पक्षाला साथ देतो, साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, तोच करा साहेबांचा मावळा आहे. बरेच जण म्हणतात काम करायचे आहेत.म्हणून सोबत जाऊ मात्र त्यांनी लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं. लोकांच्या संघर्षात त्यांना साथ द्या जनता तुमच्याच पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही.

100 वर्षा वर्षाचे व्हिजन आणि दूरदृष्टी असणारा आपला नेता.अजून काय हवं..चार दिवस सासूचे असतील तर चार दिवस सुनेचे देखील असतात.वाटलं नव्हत आमदार होईल..पण शरद पवार साहेबांमुळे मी आमदार झालो.मी आमदार झाल्यावर चिमटा घेऊन चेक केलं खरच झालो काय..खासदार झाल्यानंतर देखील तीच परिस्थिती होती, हे सगळं शरद पवारांच्या ताकदीमुळे झालं, अशा भावना लंकेंनी व्यक्त केल्या.

sharad pawara nilesh lanke
Ajit Pawar: मी दिसायला देखणा, चिकणा..., कुणी जाऊन माझ्या बायकोला सांगा! असं अजितदादा का म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत निलेश लंके म्हणाले, "धीर धरा..काहींना लय घाई झाली..थांबा ना जरा, आपल्या नेत्याला राजकारणातील सगळे फायदे- तोटे, सगळी गणितं माहिती आहेत.आपण त्यांना सल्ला द्यायला चाललो आहोत, आपण अजून अंड्यात आहोत, जेव्हा आपण हाफ चड्डीत होतो, तेव्हा ते देशात राजकारणात होते, असा सल्ला अजित पवारांसोबत चला म्हणणाऱ्या नेत्यांना निलेश लंके यांनी दिला.

अनेकांना पवारसाहेब समजले नाहीत, ५५ वर्ष ते राजकारणात पुरून उरले. रावणाचा सुद्धा काळ संपला, आशावादी रहा..दिवस बदलत असतात, संघर्षाची तयारी ठेवा..नैराश्य आलं तर पवारांचा जीवनपट पाहा, असं निलेश शेळके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com