Imtiaz Jaleel sarkarnama
मराठवाडा

AIMIM Maharashtra News : `एमआयएम` ला महाराष्ट्रात दुसरा भिडू मिळेना..

VBA Alliance News : दलित मुस्लिम मतांचा योग वंचितने एमआयएमशी युती तोडल्यामुळे पुन्हा येण्याची शक्यता कमीच आहे.

Jagdish Pansare

Marathwada Political News : गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत एमआयएमने राज्यात आपला एकमेव खासदार निवडून आणत खाते उघडले होते. वंचितसोबतची ही आघाडी मात्र अवघ्या नऊ महिन्यात तुटली आणि विधानसभा निवडणुकीत वंचि ने `एकला चलो` ची भूमिका स्वीकारली. (AIMIM Maharashtra News) दलित- मुस्लिम समाजाचे एक गठ्ठा मतदान आणि हिंदू मतांमध्ये झालेली फूट या जोरावर एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

एमआयएमच्या (AIMIM) या विजयाची देशभरात चर्चा झाली शिवाय हा ऐतिहासिक विजय असल्याचा दावाही एमआयएमच्या नेत्यांनी केला. शिवसेनेच्या बालेकिल्याला तडा देण्याचे काम एमआयएमने केले ही ऐतिहासिक कामगिरी असली तरी त्यांचा विजय हा खूप मोठा होता, असे म्हणता येणार नाही. (Maharashtra) सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरे यांनी हिंदू मतांच्या फाटाफुटीनंतरही एमआयएमला जोरदार टक्कर दिली.

अवघ्या साडेचार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. गेल्या पाच वर्षात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) संसदेत विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत. अभ्यासू आणि आक्रमकपणे मतदारसंघातील प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले. मतदारांकडून त्यांच्या या कामाचे कौतुकही होत आहे. मात्र 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांना पुन्हा जिंकता येईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुती- महाविकास आघाडीमध्ये लाथाळ्या असल्या तरी 2019 च्या निवडणुकीत जुळून आलेला दलित मुस्लिम मतांचा योग वंचितने एमआयएमशी युती तोडल्यामुळे पुन्हा येण्याची शक्यता कमीच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्तियाज जलील हे महाराष्ट्राचे एमआयएमचे एकमेव खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. लोकसभा निवडणुकीत दुसरा विजय मिळवायचा असेल तर एका चांगल्या पक्षाची साथ आवश्यक आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. वंचितसोबत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिघडलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न असदोद्दीन ओवेसी यांनीही केले. परंतु प्रकाश आंबेडकर आता एमआयएमसोबत जाण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार नाहीत.

वंचित आता ठाकरेंसोबत..

उलट त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने स्पष्ट शब्दात एमआयएमला नकार दिल्यानंतर गेल्या वर्षभरापासून ते नव्या मित्राच्या शोधात आहेत. मात्र लोकसभा निवडणूक पाच महिन्यांवर आलेली असतानाही एमआयएमचा हा शोध अद्याप संपलेला नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यात झालेली महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील `इंडिया` मध्येही एमयएमला स्थान देण्यात आलेली नाही. याची सलही असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अनेकवेळा बोलून दाखवली.

परंतु एमआयएमवर भाजपची `बी` टीम असल्याचा बसलेला शिक्का त्यांना अद्यापही पुसता आलेला नाही. इम्तियाज जलील यांना 2024 च्या निवडणुकीत ही सर्वात मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे शिवसेनेत फूट पडली असली तरी त्यामुळे होणारे नुकसान ठाकरेंचा लोकसभेतील उमेदवार भरून काढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत साडेचार हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना उद्धव ठाकरे एक संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे झाले तर ज्या वंचितच्या मदतीमुळे गेल्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते, त्याच वंचितच्या साथीने खैरे पाचव्यांदा लोकसभेवर जाऊ शकतात. एमआयएमकडे कोणीही मैत्रीचा प्रस्ताव घेऊन येत नसल्यामुळे इम्तियाज जलील अस्वस्थ झाले आहेत. यातूनच त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीला `आम्हाला सोबत घ्या`, अशी साथ घातली आहे. अर्थात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असल्यामुळे ही शक्यताही नाही. त्यामुळे त्यांच्या या मागणीकडे मनोरंजन म्हणूनच पाहिले जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT