Loksabha Session News : देशात चांगले रस्ते, उड्डाणपूलांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय निश्चितच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनाच जाते. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदनही करतो. (Loksabha Winter Session) पण नाशिक, नगर, पुण्यात झाले तसे अखंड पूल माझ्या मतदारसंघात का होत नाहीत? माझ्या मतदारसंघाला सावत्र वागणूक का देता? असा चिमटा खासदार इम्तियाज जलील यांनी नितीन गडकरी यांना काढला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील नियोजित मेट्रो आणि चिकलठाणा ते वाळूज एमआयडीसी दरम्यान एकच अखंड पूल उभारण्याचा आराखडा गुंडाळण्यात आला आहे. या मुद्याकडे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे लक्ष केंद्रित केले. मेट्रो आणि एकच अखंड पूल उभारण्यासाठीच्या डीपीआरवर सात कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता हा आराखडाच रद्द करण्यात आला आहे.
नगर, नाशिक, पुणे सारख्या शहरात असे अखंड पूल उभारण्यात आले आहेत, मग माझ्या मतदारसंघावरच अन्याय का करता ? दोन वर्षापुर्वी मी आपल्याला भेटलो होतो, आपण सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून अखंड पुलासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Marathwada) आमच्या शहरातले दुसरे मंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तर फ्लाय ओव्हर आणि त्यावर मेट्रोचा प्रकल्प आणणार म्हणून डीपीआरवर सात कोटी खर्च केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता आम्हाल समजतंय की ते सर्व रद्द झाले आहे. तेव्हा गडकरीजी माझ्या मतदारसंघातील विकासकामावंरही आपली कृपादृष्टी करावी, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी आपला मुद्दा रेटला. यावर गडकरी यांनी अखंड पूल आणि मेट्रोचा प्रकल्प रद्द झाल्याचे मान्य केले. मेट्रो आणि अखंड पुलाचा प्रकल्प आम्ही जिथून राष्ट्रीय महामार्ग जातो तिथेच करतो.
परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे हा प्रकल्प प्रस्तावित होता तो राष्ट्रीय महामार्ग नसून राज्य मार्ग आहे, त्यामुळे हा प्रकल्प तिथे शक्य नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. परंतु पुणे-संभाजीनगर हा जो नवा एक्स्प्रेस हायवे आम्ही तयार करणार आहोत, त्यात या अखंड पुलाचा समावेश करता येतो का? यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्हाला राज्य सरकारची मदत लागणार आहे, ती करण्याची तयारी त्यांनी दाखवल्याची माहिती मला मिळाली आहे.
त्यामुळे तुमच्या मतदारसंघाला सावत्र वागणूक देण्याचा प्रश्नच नाही. माझ्यासाठी मराठवाडा महत्वाचाच आहे. महाराष्ट्रातील हा एक मोठा आणि विकासापासून लांब असलेला भाग आहे. त्यामुळेच मराठवाड्यात १ लाख कोटींची रस्ते आणि उड्डाणपुलांची कामे सध्या केली जात आहे, असेही गडकरी यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.