Ajit Pawar 
मराठवाडा

Ajit Pawar : 'चक्की पिसींग, पिसींग, पिसींग...' : CM फडणवीसांचा डायलॉग अजित पवारांनी मारला; ठेकेदारांना भरला दम

Ajit Pawar: कामाची सुरुवात सकाळी लवकर करणारे पवार कामांतील बारीक-सारीक उणिवाही पटकन हेरतात आणि मग यंत्रणा, ठेकेदारांचे कानही उपटतात.

Datta Deshmukh

दत्ता देशमुख

Beed NCP news : उपमुख्यमंत्री अजित पवार शब्दाचे पक्के आणि बोलण्यात मागे पुढे न पाहणारे नेते म्हणून ओळखले जातात. कामाची सुरुवात सकाळी लवकर करणारे पवार कामांतील बारीक-सारीक उणिवाही पटकन हेरतात आणि मग यंत्रणा, ठेकेदारांचे कानही उपटतात. आजच्या बीडच्या कार्यक्रमात त्यांनी ठेकेदारांना चांगलाच दम भरला. काम नीट करा, नाही तर 'चक्की पिसींग' असा इशाराच दिला.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल 575 कोटी रुपये निधी खर्च करुन करण्यात येणाऱ्या 1363 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. तसेच, 15 कोटी रुपयांचे सहकार भवन आणि 80 लाख रुपयांच्या टेनिस कोर्टचे लोकार्पण केले.

जिल्ह्यात चांगले काम होत आहे. त्याला जनतेचीही साथ आहे, त्यामुळे येथील जनतेला धन्यवाद देतो, असे पवार म्हणाले. एकाच वेळी आपण 1363 कामे हाती घेतली आहेत. मात्र, सरकारच्या पैशातून होणारी कामे दर्जेदार व्हावीत, यात अनियमितता चालणार नाही. कामापूर्वीचे फोटो आणि कामानंतरचे फोटो आवश्‍यक असल्याचे अजित पवार यांनी सांगीतले. यापूर्वी अनेक घोटाळे झाले आहेत. अगदी माझीच खोटी स्वाक्षरी मारल्याचा प्रकारही घडला असून आणखीही काही बाबी असल्याचे पवार म्हणाले.

ज्यांना ठेकेदारी करायची त्यांनी राजकारणात येऊ नये आणि ज्यांना राजकारण करायचे त्यांनी ठेकेदारी करु नये, असा सल्लाही पवारांनी यावेळी दिला. अनेकदा असे लोक आमच्यासोबत फोटो काढतात आणि पुन्हा तेच फोटो अधिकाऱ्यांना दाखवतात. मात्र, अधिकाऱ्यांनी कामांवर लक्ष देण्याची सुचनाही पवारांनी दिली. मला कामात हलगर्जीपणा, हयगय चालणार नाही असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT