Ambadas Danve: "प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचे गुलाम, उमेदवारांना माघारीसाठी धमकावतात"; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्यादांच 99 उमेदवार दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेही एवढेच उमेदवार भाजपसोबत युती तुटल्यानंतर मैदानात उतरवले आहेत.
Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्यादांच 99 उमेदवार दिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेही एवढेच उमेदवार भाजपसोबत युती तुटल्यानंतर मैदानात उतरवले आहेत. उद्या (ता. 2) रोजी दुपारपर्यंत माघारीची मुदत आहे.

शहरातील अनेक प्रभागात शिंदेंच्या शिवसेनेची फाईट ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसोबत होणार आहे. अशातच ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. जिल्ह्यातील मंत्री ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांना अर्ज माघारीसाठी धमकावत आहेत. प्रशासकीय अधिकारी या मंत्र्यांचे गुलाम झालेत तेच हा प्रकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Ambadas Danve
PMC Election: आलिशान गाड्यांच्या चर्चेत ‘माणुसकीची गाडी’ ठरतेय लक्षवेधी! पुण्यात उमेदवाराच्या नावावर केवळ रुग्णवाहिका

उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर दानवे म्हणाले, "लक्षात ठेवा! आमच्याकडेही खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल, वेळ आल्यावर व्याजसकट परतफेड ही निश्चित होणार अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना आव्हान दिलं आहे. आपले काम, नीतीमत्ता विसरून काम करणाऱ्यांचा बाजार मुळासकट उठवला जाईल. 'झुकेगा नही साला' असा इशाराच अंबादास दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला आहे.

Ambadas Danve
ECI Terms: महापालिका निवडणुकीचा अर्ज भरताना आयोगाच्या अजब अटी! असा उमेदवार भारतात तरी कुठे सापडेल का?

जे अधिकारी उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमकावत आहेत, त्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मी त्यांची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा अंबादास दानवे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला. निवडणुक आयोगानेही या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष हे स्वबळावर लढत आहेत. मुंबई महापालिके प्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडेही असणार आहे.

Ambadas Danve
Lok Sabha Election 2024 : भाजपवर नाराज असलेली मुस्लिम व्होट बँक ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का? अशी आहे राजकीय समीकरणं

शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या महापालिका निवडणुकीत शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 'काँटे की टक्कर' अपेक्षित आहे. भाजपसोबत युती तुटल्यानंतर संजय शिरसाट यांनी युती तोडल्याचा आरोप करत स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. तर भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांनी स्वतःचा मुलगा आणि मुलीला उमेदवारी मिळावी म्हणून युती तोडल्याचा पलटवार केला होता.

Ambadas Danve
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीत सात मुस्लिम उमेदवार दिले आहेत. माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा पक्षप्रवेश आणि नंतर त्यांच्या उमेदवारीवरून आधीच खैरे विरुद्ध दानवे असा जुनाच संघर्ष नव्याने उफाळून आला आहे. अशातच आता अंबादास दानवे यांनी सत्ताधारी शिवसेना पक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्ष आमच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावले जात असल्याचा आरोप केला. या आरोपाला अद्याप शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर आलेले नाही. मात्र या आरोपाने खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com