DCM Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : बीडच्या 'डीपीडीसी' निधीवर अजितदादा इफेक्ट; वाल्मिक कराडचा 'तो' पॅटर्न बंद, 91 कोटी रुपयेही वाढवले!

After taking charge as Guardian Minister, Ajit Pawar increased the fund allocation for the Beed District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 575 कोटी रुपयांच्या विकास निधीचे नियोजन होणार आहे. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा विकास आराखडा 484 कोटी रुपयांचा होता.

Jagdish Pansare

Beed Political News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडमोडीने वातावरण ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचा देशमुख खून प्रकरणातील हात या सगळ्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला. आता मात्र अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारत डीपीसीमधील वाल्मीक कराड पॅटर्न उधळून लावला आहे. 91 कोटीची निधीत वाढ करत त्यांनी बीडकरांना विकास कामांचा विश्वास दिला आहे.

वाढती गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप, दरोडे, खून आणि ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे बीड जिल्ह्याची राज्यभरात बदनामी झाली. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे घेतले. एक आव्हान म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. दोन बैठका घेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा, विकास कामे, त्यासाठीचा निधी, रखडलेले प्रकल्प याची माहिती घेतली आणि आता जिल्हानियोजन समितीचा निधी 91 कोटींनी वाढवून दिला. एकूण 575 कोटींचे नियोजन डीपीसीत करण्यात आले आहे.

येत्या सोमवारी (ता.19) रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्याचा थेट फायदा बीडला (Beed News) होताना दिसतो आहे. जिल्हा विकास आराखड्यासाठीचा निधी वाढवण्यात आला असून यात 91 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 575 कोटी रुपयांच्या विकास निधीचे नियोजन होणार आहे. जिल्ह्याचा मागच्या वर्षीचा विकास आराखडा 484 कोटी रुपयांचा होता.

यंदा त्यात 91 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्येमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा समोर आला. तसेच जिल्ह्यातील वाळू माफियागीरी, राख माफियागीरी, प्रशासनातील अधिकाऱ्यांची ठराविक नेत्यांसोबतच्या मिलीभगतमुळे विकासाचा वाढलेला अनुशेष या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतले. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ केली.

तत्पुर्वी पोलिस अधीक्षकांचीही बदली झाली. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाली. अशा पद्धतीने जिल्ह्यात साफसफाई करत अजित पवार यांनी बीडचा कारभार आपल्या पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बीडवर लागलेला बदनामीचा डाग पुसून या जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विकास कामात गैरप्रकार, हलगर्जीपण अजिबात खपवून घेतला नाही, असे अजित पवार वारंवार बैठकांमधून सांगतात.

सोमवारी होणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा याचा अनुभव आणि अजित पवारांच्या कामाचा धडका बीडकरांना दिसणार आहे. बीडच्या पाणी प्रश्नावरही या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महिनाभर बीडकरांना पाणी न मिळाल्याने संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपुर्वी शहरात निदर्शने करत अजित पवार यांच्या प्रतिमेला अंघोळ घातली होती.

यावर होणार निर्णय..

जिल्ह्याला विमानतळ, टाटाच्या साह्याने आधुनिक प्रशिक्षण केंद्र असे प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रशासनातील खाबुगिरीवर काही प्रमाणात नियंत्रण आले असून प्रशासनात शिस्त लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आपापल्या विभागांच्या विकास कामांचे मागणीपत्र तयार करत आहेत. सीआयआयआयटी (सेंटर फॉर इनोव्हेशन इक्युबेशन अँड ट्रेनिंग), विमानतळ अशा प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे. तसेच, आरोग्य विभागातही आता दुरुस्तींच्या नावाखाली होणारी उधळपट्टी बंद होणार असून आधुनिक उपचाराचे उपकरणे दिली जाणार आहेत. त्या दृष्टीने मागण्या नोंदवून घेतल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT