Beed Politics : संपूर्ण राज्यात भाकरी फिरवली, पण बीडचं काही ठरेना; मुंडे-धसांच्या वादामुळे भाजपला नवा कारभारी मिळेना?

BJP Beed conflict : भारतीय जनता पक्षाने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्या आहेत.
Suresh Dhas Vs Pankaja Munde
Suresh Dhas Vs Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 14 May : भारतीय जनता पक्षाने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्या आहेत.

भाजपने संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या बदल्या केल्या असल्या तरी मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाध्यपदी कोणतीही निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे.

Suresh Dhas Vs Pankaja Munde
Sharad Pawar : 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती प्रत्येक खासदाराला देण्यावरून काँग्रेस अन् शरद पवारांमध्ये मतभेद; नेमकं प्रकरण काय?

तर बीडमध्ये भाजपने कोणतीही निवड न करण्याला भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वाद कारणीभूत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद कधीच लपून राहिलेला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस दे दोघे एकमेकांवर कधी थेट तर अप्रत्यक्षपणे टीका करत असतात. नुकतंच काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

मात्र यातही धसांच्या आष्टी मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडला नाही. अशातच आता भाजपच्या हायकमांडणे संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. मात्र, बीडमध्ये अध्यक्षपदाची निवड केली नाही. त्यामुळे बीडचा जिल्हाध्यक्ष न निवडण्याला धस आणि मुंडे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Suresh Dhas Vs Pankaja Munde
Shivsena UBT Crisis : राजीनामा देताच 'मातोश्रीला' खडबडून जाग; ठाकरेंकडून घोसाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मस्के यांच्या जागेवर शंकर देशमुख यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता भाजप आगामी जिल्हाध्यक्षपदाची सुत्र कोणाकडे देणार? याकडे आता संपूर्ण बीडची नजर लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com