Pratap patil Chikhlikar Video Call To Ajit Pawar For Flood Updates Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : प्रताप पाटील चिखलीकरांचा व्हिडिओ काॅल, अजित पवारांनी नांदेडच्या पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्याचा दिला शब्द!

Nanded District Flood-Heavy Rain Updates : प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, स्वतः आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

Jagdish Pansare

  1. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी अजित पवारांनी “सर्वस्व पणाला लावू” अशी ग्वाही दिली.

  2. हा शब्द अजित पवारांनी व्हिडिओ कॉल दरम्यान दिला असून याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सार्वजनिक केली.

  3. या घोषणेमुळे नांदेड पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून राजकीय चर्चाही रंगल्या आहेत.

Nanded Heavy Rainfall News : नांदेड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसाने दाणादाण उडवली, आता पून्हा या भागात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. सर्वाधिक नूकसान झालेल्या नांदेड जिल्ह्याला राज्य सरकारने साडेपाचशे कोटींची मदत दिली आहे. परंतू नुकसान पाहता अधिकची मदत मिळवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्ह्यातील नेते प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संवाद घडवून आणला. चिखलीकर यांनी अजित पवारांना व्हिडिओ काॅल लावला तेव्हा ते बारामती जिल्ह्यातील माळेगाव येथील साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत होते. परंतु पूरग्रस्त भागातून आलेला हा व्हिडिओ काॅल आणि त्याचे महत्व लक्षात घेत अजित पवारांनी तो घेतला आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला.

नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे संसार पून्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असा शब्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी या संवादा दरम्यान, दिला. धान्य, पाच हजाराची मदत दिली जात असली तरी आणखी जास्त मदतीसाठी आपण प्रयत्न करू. कोणीही काळजी करू नका. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, स्वतः आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, असा धीर आणि विश्वास नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना त्यांनी धीर दिला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मणार धरण परिसरातील बहाद्दरपुरा, शेकापूर, घोडज पूरबाधित नागरिकांशी त्यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.

या कॉलदरम्यान अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या भागांत नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर किंवा आर्मीची मदत घेण्याची आवश्यकता आहे का? एनडीआरएफचे पथक तातडीने पाठवावे लागेल का याबाबत सविस्तर माहिती घेतली. 'या संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जातील. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे',अशा शब्दांत अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला.

FAQs

प्र.१. अजित पवारांनी पूरग्रस्तांना काय आश्वासन दिलं?
उ. त्यांनी पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असं आश्वासन दिलं.

प्र.२. ही माहिती कोणाकडून मिळाली?
उ. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली.

प्र.३. अजित पवारांनी हे आश्वासन कशा माध्यमातून दिलं?
उ. त्यांनी व्हिडिओ कॉल दरम्यान पूरग्रस्तांना आश्वासन दिलं.

प्र.४. हा व्हिडिओ कॉल कोणत्या संदर्भात झाला होता?
उ. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधताना हा कॉल झाला.

प्र.५. या घोषणेमुळे काय परिणाम झाला?
उ. पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आणि राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT