Ambadas Danve sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : 'खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर...'; अंबादास दानवेंच्या आवाहनाचा गर्भित इशारा काय?

Shivsena UBT : सत्ताधाऱ्यांनी दबावाचे राजकारण करत शिवसैनिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता.

Jagdish Pansare

Ambadas Danve News : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती राज्यातील सर्वच मतदारसंघात झाल्या. शेवटच्या टप्प्यात विशेषता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये संथ मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट आणि जाहीर पत्रकार परिषद घेऊन याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. दरम्यान राज्याच्या विविध भागात मतदानाच्या दिवशी झालेल्या वादावादीतून ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सत्ताधाऱ्यांनी दबावाचे राजकारण करत शिवसैनिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता. यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत त्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना खोटे गुन्हे दाखल झाले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांत, तालुक्यामध्ये शिवसैनिकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा प्रकरणातील संपूर्ण तपशील आणि कागदपत्रे आपण माझ्याकडे पाठवावी, असे आवाहन दानवे Ambadas Danve यांनी समाज माध्यमांच्या मार्फत केले आहे.

29 मे पर्यंत गुन्हा दाखल झाल्याची माहिती व त्या संदर्भातील कागदपत्रे प्रत्यक्ष भेटून किंवा मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवावी, असेही दानवे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने Shivsena लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोग आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर राजकीय दबाव आणून त्रास दिल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानानंतर या आरोपात आणखी वाढ झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात अत्यंत संथ गतीने मतदान होऊन मतदारांसाठी योग्य सोयी सुविधा, उपायोजना न केल्याचा आरोप करत आपल्या विरोधातील मतदार होऊ नये यासाठी सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदान प्रक्रिया मुद्दाम संथ गतीने राबवली, अशी गंभीर टीका ठाकरे पिता-पुत्रांनी केली होती. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागवून सरकार विरोधात आक्रमक पवित्र घेतल्याचे दिसून आले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT